Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात हॉट सीटवर  परेश रावल आणि विजय केंकरे

सर्व सामान्य नागरिकांना लाखो रुपये जिंकण्याची संधी देणारा मराठमोठा गेम शो म्हणजे अर्थात ‘कोण होणार करोडपती’. सोनी हिंदी वाहिनीवर ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमुळे याचे मराठीमध्ये रूपांतर करण्यात आले. याचे तीन पर्वे कलर्स मराठी वाहिनी आणि नंतरची पर्वे सोनी मराठी वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आली. या कार्यक्रमाचे सचिन खेडेकर, स्वप्नील जोशी आणि नागराज मंजुळे यांनी विविध पर्वात सूत्रसंचालन केले होते.२०१३ पासून सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सुरवात झाली होती आणि मुक़्ताच याचा नवीन सीजन ही प्रेक्षकांच्या समोर दाखल झाला आहे. जनसामान्यांचा लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ परेश रावल आणि विजय केंकरे  हॉट सीटवर येणार आहेत. ह्युमॅनिटेरिअन एड फाउंडेशन या संस्थेसाठी परेश रावल आणि विजय केंकरे ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. मागील विशेष भागात श्रिया आणि सचिन पिळगांवकर या बापलेकीच्या जोडीने हजेरी लावली होती.(kon honar crorepati)

Kon Honar Crorepati
Kon Honar Crorepati

या आठवड्यातील विशेष भागात परेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र हॉट सीटवर बसणारआहेत. परेश रावल हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचे आवडते कलाकार. त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. बाबूराव गणपतराव  आपटे ही व्यक्तिरेखा मराठी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. मराठीबरोबर त्यांचे सुरुवातीपासूनच अनोखे नाते जोडले गेले  आहे. मराठी भाषेबद्दल असलेले त्यांचे प्रेम व अनोखे नाते आपल्याला कोण होणार करोडपतीच्या या विशेष भागात पाहायला  मिळेल. मराठी वहिनींच्या इतिहासात परेश रावल पहिल्यांदा एखाद्या मराठी कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. त्यांची आजवर गाजलेल्या मराठी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या. 

Kon Honar Crorepati
Kon Honar Crorepati

चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते परेश रावल ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. त्यांच्याबरोबर हॉट सीटवर असणार आहेत मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक आणि अभिनेते विजय केंकरे. नाट्यकर्मी म्हणून असलेली अंगभूत ऊर्जा घेऊन, ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली ४० वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत वेगवेगळ्या शैलींतील नाटकं प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारे विजय केंकरे यांनी नुकतेच मराठी सृष्टीतील आपले शंभरावे  नाटक प्रेक्षकांच्या समोर आणले. परेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र येऊन ह्युमॅनिटेरिअन फाउंडेशन एड या संस्थेसाठी ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत.(kon honar crorepati)

===========================

हे देखील वाचा: पुण्याच्या सई आणि शरयू ठरल्या ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या महाविजेत्या

===========================

या विशेष भागात या दोघांच्या गप्पांची मैफल नक्कीच जमेल. मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी, त्या दोघांचा सिनेसृष्टीतील सुरुवातीचकाळ अशा अनेक विषयांवर या भागात गप्पा रंगल्या. प्रेक्षकांसाठी हा भाग म्हणजे पर्वणीच ठरेल. यात शंका नाही.’कोण होणार करोडपती’च्या खेळाबरोबरच परेश रावल आणि विजय केंकरे यांचे मनोरंजक अनुभव ‘कोण होणार करोडपती’ विशेष भाग १० जून, शनिवारी रात्री ९ वाजता पहाता येईल.