Skip to content Skip to sidebar Skip to footer

Gadar 2 Advance Booking:  प्रदर्शनाच्या कित्येक दिवस आधीच ‘गदर 2’ सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग सुरु; OMG 2 ला देणार टक्कर !

सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर असलेला  ‘गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच दिवशी अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ हा सिनेमा सुद्धा प्रदर्शित होणार आहे. 27 जुलै 2023 रोजी निर्मात्यांनी ‘गदर 2’ चा ट्रेलर रिलीज केला, ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. आता सनी देओलच्या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे. आणि  जर तुम्हीही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुम्ही उशीर न करता तुमची सीट आताच कन्फर्म करून घ्या . प्रदर्शनाच्या 10 दिवस आधीच या सिनेमाचे त्याचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल असा अंदाज ही व्यक्त केला जात आहे. कोणत्याही चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आठवडाभर आधी सुरू होते, पण ‘गदर २’च्या निर्मात्यांनी ते १० दिवस आधीच सुरू करण्याची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी झी स्टुडिओजच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्याची माहिती दिली.(Gadar 2 Advance Booking)

Gadar 2 Advance Booking
Gadar 2 Advance Booking

‘गदर २’ चे अॅडव्हान्स तिकीट बुकिंग बुधवारपासून म्हणजेच २६ जुलैपासून सुरू झाले, पण ते काही निवडक  ठिकाणांसाठी होते. ३० जुलैपासून जवळपास संपूर्ण देशात बुकिंग सुरू झाले. म्हणजेच प्रदर्शनाच्या फक्त 12 दिवस आधी ते सुरु करण्यात आले. यावरून निर्मात्यांना चित्रपटाविषयी प्रचंड विश्वास असल्याचे स्पष्ट होते. 26 जुलै रोजी ‘गदर २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता जो चाहत्यांना खूप आवडत आहे. गदर 2 मध्ये सनी देओल पुन्हा एकदा तारासिंग च्या भूमिकेत तर अमिषा पटेल सकीना च्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. या चित्रपटात तारा आपल्या मुलासाठी सीमा ओलांडताना दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. सनी देओलसह संपूर्ण टीम या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक असून प्रत्येकाला सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 

Gadar 2 Advance Booking
Gadar 2 Advance Booking

गदर २ हा १५ जून २००१ रोजी प्रदर्शित झालेल्या गदरचा सिक्वेल आहे. गदर सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी त्याचा सिक्वेल आणण्याची योजना आखली आहे. ‘गदर २’ ज्या प्रकारे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, त्यावरून बॉक्स ऑफिसवरही तो कमाल करणार असल्याचे दिसत आहे.(Gadar 2 Advance Booking)

==========================

हे देखील वाचा: RARKPK Box Office Collection: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ने आतापर्यंत कमावले ‘एवढे’ कोटी 

==========================

गदर २ या सिनेमा सोबतच अक्षय कुमारचा ‘ओएमजी 2’ हा चित्रपटही 11 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे, त्यामुळे या दोन मोस्ट अवेटेड सिनेमांची टक्कर बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.आणि या दोघांमध्ये कोणता सिनेमा बाजी मारणार हे पाहणे सुद्धा रंजक असणार आहे.