Skip to content Skip to sidebar Skip to footer

घरावर झालेल्या गोळीबारानंतर Salman Khan पहिल्यांदाच दुबईला रवाना…

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी घरी पोहोचले होतो. आणि आता नुकताच सलमान खान मुंबई विमानतळावर ही दिसला, तो दुबईला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. सलमान खानसोबत त्याचा बॉडीगार्डही होता, गोळीबाराच्या घटनेनंतर तो पहिल्यांदाच मुंबईबाहेर प्रवास करत आहे. सलमानच्या सुरक्षेबाबत त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणीही चाहत्यांनी केली आहे. एअरपोर्टवर सलमान कॅज्युअल लुकमध्ये दिसला, त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि सनग्लासेससोबत मॅचिंग पँट घातली होती. त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.(Salman Khan)

Salman Khan
Salman Khan

एक्स फॅन पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान आपल्या बुलेटप्रूफ कारमधून उतरून बॉडीगार्ड शेरा आणि इतर सुरक्षा रक्षकांसह थेट विमानतळाच्या दिशेने जाताना दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मेगास्टार सलमान खान मुंबई विमानतळावर दिसला, तो दुबईला रवाना झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी सलमानच्या घराची सुरक्षा वाढवली आहे.सलमानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सहभागी असलेल्यांचा हेतू केवळ त्याला घाबरवण्याचा होता, त्याला मारण्याचा नव्हता, असे मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी स्पष्ट केले.

Salman Khan
Salman Khan

मुंबई क्राइम ब्रँाचच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ”आरोपींनी सलमान खानच्या पनवेलमधील फार्महाऊसची रेकी केली होती. त्यांचा हेतू फक्त त्याला घाबरवण्याचा होता, त्याला मारण्याचा नव्हता. बिहारमध्ये दोन्ही कुटुंबांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.” दरम्यान, मुंबई क्राईम ब्रँच या गोळीबाराशी संबंधित प्रकरणात साक्षीदार म्हणून सलमानचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.(Salman Khan)

=================================

हे देखील वाचा: Salman Khan’s House: घरावर झालेल्या गोळीबारावर सलीम खान यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, संपूर्ण कुटुंब दुसरीकडे शिफ्ट होणार?

==================================

रविवारी या घटनेनंतर मुंबई पोलिसांचे अधिकारी सलमानच्या घरी पोहोचले, तेव्हा सलमानने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबद्दल संताप आणि चिंता ही व्यक्त केली.