Skip to content Skip to sidebar Skip to footer

Jay Jay Shanidev: शनिदेवांची महागाथा लवकरच, अभिनेता संकेत खेडकर साकारणार शनिदेवांची भूमिका!

सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असते. आजवर पौराणिक, ऐतिहासिक, थरारक, इत्यादी मालिका सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळाल्या आहेत. त्यातच आता सोनी मराठी वाहिनीने नवी मालिका घोषित केली आहे. ‘जय जय शनिदेव‘ असे या मालिकेचे नाव आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता ‘शनिदेव’ यांच्यावर आधारित ही नवी मालिका असणार आहे. अभिनेता संकेत खेडकर हा शनिदेवांची भूमिका साकारणार आहे. याआधी विविध मालिकांमधून काही भूमिका त्याने साकारल्या आहेत.(Jay Jay Shanidev Marathi Serial)

Jay Jay Shanidev Marathi Serial
Jay Jay Shanidev Marathi Serial

पण प्रमुख भूमिका म्हणून ‘शनिदेव‘ ही संकेतची पहिलीच भूमिका आहे. विशेष म्हणजे संकेत हा मूळचा अहमदनगर चा असून ‘जय जय शनिदेव‘ मालिकेत शनिदेवांची भूमिका साकारणं हे त्याचं भाग्यच म्हणावं लागेल. काही दिवस आधी ‘जय जय शनिदेव’ मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. शनिदेवांची भूमिका कोण साकारणार आणि त्यांची वेशभूषा कशी असेल याची चर्चा तेव्हापासूनच रंगली होती. पण आता शनिदेवांची वेशभूषा प्रेक्षकांसमोर आली आहे. त्यावर मिळणारा प्रतिसाद आणि प्रेक्षकांचे प्रेम पाहून शनिदेव हा विषय प्रेक्षकांच्या किती जवळचा आहे, हे कळतं आहे.

Jay Jay Shanidev Marathi Serial
Jay Jay Shanidev Marathi Serial

शनिदेव यांच्यावर आधारित मालिका पहिल्यांदाच टीव्हीवर पाहता येणार आहे. सोनी मराठी वाहिनीने पहिलं पाऊल उचललं आहे. प्रेक्षकांची आतुरता आता शिगेला पोहोचली आहे. शनिदेव ही न्यायाची देवता आपल्या भक्तांच्या जीवनात सुख, शांतता आणि समाधान मिळवून देण्यासाठी मदत करते. शनिदेवांचा हा इतिहास अजून कोणीही प्रेक्षकांसमोर आणलेला नाही. ८ मे पासून तो सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे.(Jay Jay Shanidev Marathi Serial)

=======================

हे देखील वाचा: Nivedita Majhi Tai: निवेदिता आणि यशोधन यांच्या लग्नसोहळ्यात येणार मोठा ट्विस्ट

========================

जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता ‘शनिदेव’ यांचा जीवनप्रवास या मालिकेतून उलगडणार आहे. संकेत खेडकर हा अभिनेता शनिदेवाची भूमिका कशा प्रकारे साकारतो, ते आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे पाहायला विसरू नका, ‘जय जय शनिदेव‘, ८ मेपासून रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.