Skip to content Skip to sidebar Skip to footer

Kiara Advani, Aditi Rao Hydari सह ‘या’ बॉलीवुड अभिनेत्री यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लावणार हजेरी 

77 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल 14 मे पासून सुरू झाला असून ते 25 मे पर्यंत चालणार आहे. यामध्ये जगभरातील नामवंत सेलिब्रिटी सहभागी होताना दिसणार आहेत. त्याचबरोबर भारताकडून या फिल्म फेस्टिव्हलमध्ये काय खास असणार आहे? आणि कोण कोण यात सामील होणार आहेत ते जाणून घेउयात. अभिनेत्री शोभिता धुलिपाला ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियम आईस्क्रीम ब्रँड मॅग्नम इंडियाचे प्रतिनिधित्व करत फ्रेंच रिव्हेरावरील रेड कार्पेटवर चालणार आहे. त्याच बरोबर ‘शेरशाह‘ आणि ‘भूल भुलैया 2‘ सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री कियारा अडवाणी नेहमीच चर्चेत असते. सध्या ही अभिनेत्री 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्यामुळे चर्चेत आहे.(Bollywood Actress in 77th Cannes Film Festival 2024)

Bollywood Actress in 77th Cannes Film Festival 2024
Bollywood Actress in 77th Cannes Film Festival 2024

खरं तर आज म्हणजेच 14 मे पासून 77 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरु होत आहे. सिनेप्रेमींसाठी आजचा दिवस खूप खास आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी भारतातून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. अभिनेत्री कियारा अडवाणी ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये वुमन इन सिनेमा गाला डिनरमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. ही बातमी समोर आल्यापासून कियाराचे चाहते तिच्या या नव्या यशामुळे खूप खूश आहेत. कियाराव्यतिरिक्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐश्वर्या राय बच्चन या इव्हेंटचा भाग असणार आहे.

Bollywood Actress in 77th Cannes Film Festival 2024
Bollywood Actress in 77th Cannes Film Festival 2024

इतकंच नाही तर यावेळी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘हीरामंडी’ची बिब्बोजन‘ म्हणजेच अभिनेत्री अदिती राव हैदरी ही आपली स्टाईल दाखवणार आहे. म्हणजेच यावेळी भारतातील चार अभिनेत्री या इव्हेंटमध्ये आपली स्टाईल दाखवणार आहेत. अशा तऱ्हेने हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा ठरणार आहे. सध्या कियारा अडवाणी या इव्हेंटमध्ये असल्याची चर्चा आहे, पण आतापर्यंत तिने स्वत: या बातमीला दुजोरा दिलेला नाही.(Bollywood Actress in Cannes Film Festival 2024)

=============================

हे देखील वाचा: Panchayat 3 Trailer: फुलेरा गावच्या पंचायतीत येणार नवा ट्विस्ट,’पंचायत 3′ चा धमाकेदाक ट्रेलर पाहिलात का?

=============================

कियारा अडवाणी च्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच दाक्षिणात्य अभिनेता राम चरणसोबत ‘गेम चेंजर‘ या पॉलिटिकल अॅक्शन थ्रिलर चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच तीची जोडी रामसोबत आहे. याशिवाय कियाराकडे हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआरचा ‘वॉर २’ आहे. त्याचबरोबर ही अभिनेत्री ‘डॉन ३’मध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे.