Skip to content Skip to sidebar Skip to footer

नागराज मंजुळे ओटीटी गाजवायला सज्ज; Matka King मध्ये विजय वर्मासह सई ताम्हणकर ही दिसणार महत्वाच्या भुमिकेत

अभिनेते विजय वर्मा यांना परिचयाची गरज नाही. समर्पण, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘रंगरेज’, ‘सुपर ३०’, ‘लस्ट स्टोरीज २’, आलिया भट्टस्टारर ‘डार्लिंग्स’, ‘मर्डर मुबारक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, प्राइम व्हिडिओने आगामी वेब सीरिज ‘मटका किंग’मधील विजय वर्माचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करून चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.(Matka King Web Series)

अभिनेता विजय वर्मा मटका किंग‘ या सिरीजमध्ये नव्या अवतारात झळकणार आहे. चाहत्यांना याबद्दल उत्सुकता ठेवण्यासाठी प्राईम व्हिडिओने यासंदर्भातील एक महत्वाचे अपडेट जारी केले आहे. ‘मटका किंग’ मालिकेतील विजय वर्माची लूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत प्राइम व्हिडिओने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुमचा सट्टा लावण्यास तयार! मटका किंग लवकरच अॅमेझॉन प्राईमवर येणार आहे. ‘या सीरीज संदर्भातली आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे ही सीरीज मराठमोठ्या नागराज मंजुळे यांची असून या सीरिजमध्ये सई ताम्हणकर ही महत्वाच्या भूमिकेत आपल्याला पहायला मिळणार आहे तसेच आणखी एक मराठमोळ्या कलाकाराच नाव या सिरिजशी जोडल जात आहे ते म्हणजे सिद्धार्थ जाधव याच . 

Matka King Web Series
Matka King Web Series

मटका किंग’ हा क्राइम थ्रिलर आहे. मुख्य भूमिकेत विजय वर्मा पूर्णपणे आकर्षक दिसत आहे. सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज मंजुळे यांच्यासह गार्गी कुलकर्णी, आशिष आर्यन आणि अश्विनी सिधवानी या मालिकेची निर्मिती करत आहेत. रॉय कपूर फिल्म्सच्या बॅनरखाली या मालिकेची निर्मिती होत असून नागराज मंजुळे यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. नागराज मंजुळे यांच्यासह अभय कोरणे यांनी ही मालिका लिहिली आहे.(Matka King Web Series)

=============================

हे देखील वाचा: विंचूंसोबत स्टंट करणे पडले महागात; ‘खतरों के खिलाडी’च्या स्टंट दरम्यान शालीन भनोट जखमी

=============================

मटका किंग‘ सिरिजबद्दल बोलायचे झाले तर त्याची कथा १९६० च्या दशकातील मुंबई शहरातील एका काल्पनिक कथेभोवती फिरते, जिथे एक कापूस व्यापारी मटका हा जुगार खेळ सुरू करतो. हळूहळू या खेळाला अभूतपूर्व गती मिळू लागते आणि पुढे जे घडते ते उर्वरित मालिका बनवते. विजय वर्मा, कृतिका कामरा, सई ताम्हणकर, गुलशन ग्रोव्हर आणि सिद्धार्थ जाधव या सिरिज मध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला पहायला मिळत आहेत. आता विजय वर्माच्या लूक नंतर सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ जाधव चा लूक पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत.