Skip to content Skip to sidebar Skip to footer

Kalki 2898 AD सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू; आतापर्यंत करोडोंच्या तिकिटांची झाली विक्री

प्रभास-दीपिका स्टारर ‘कल्की 2898 एडी‘ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, त्याचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांच्या खुप असून हीच क्रेझ कायम ठेवण्यासाठी चित्रपट निर्माते काही ना काही अपडेट्स शेअर करत असतात. या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले होते. त्याचबरोबर आता भारतातही अॅडव्हान्स बुकिंग वेबसाइट सुरू झाली आहे. ‘कल्की 2898 एडी या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगचेही विक्रम आता मोडले आहेत. नाग अश्विनचा चित्रपट ‘कल्की 2898 एडीची लोकांमध्ये बंपर क्रेझ वाढत आहे. प्रभास आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘कल्की 2898 एडी’ने परदेशात अॅडव्हान्स बुकिंगमध्ये धुमाकूळ घातला आहे.( Kalki 2898 AD Advance Booking)

Kalki 2898 AD Advance Booking
Kalki 2898 AD Advance Booking

उत्तर अमेरिकेत या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आतापर्यंत वितरकाने ७७,००० हून अधिक तिकिटे विकली आहेत आणि २.६ दशलक्ष डॉलर्सची विक्री केली आहे. दिग्दर्शक नाग अश्नीन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या कल्की 2898 एडी च्या अॅडव्हान्स बुकिंगदरम्यान एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार, अनेक चाहते सोशल मीडियावर तक्रार करत आहेत की, जेव्हा ते साऊथमध्ये तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा साइट क्रॅश झाली. रिपोर्टनुसार, हैदराबादसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. हे चित्र पाहता या चित्रपटाचे सकाळचे शोही फुल्ल होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Kalki 2898 AD Advance Booking
Kalki 2898 AD Advance Booking

संपूर्ण उत्तर अमेरिकेत सर्व भाषांमध्ये चित्रपटांच्या तिकिटांची बॅच आहे. एक्सवर पोस्ट शेअर करत त्याने लिहिले की, ‘उत्तर अमेरिकेत ७७,७७७+ तिकिटे विकली गेली आहेत. प्रभासचा हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून प्रेक्षकही हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.उत्तर अमेरिकेत या चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये इतिहास रचला आहे. 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला ‘कल्की 2898 एडी‘ हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट ठरणार आहे. कल्कीचे परदेशात वितरण अनिल थडानी यांची कंपनी एए क्रिएशन्स करत आहे. अॅडव्हान्स तिकिटांची आकडेवारी पाहिली तर हा चित्रपट पहिल्या दिवशीही चांगले कलेक्शन करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.(Kalki 2898 AD Advance Booking)

=================================

हे देखील वाचा: चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘मुंज्या’ ओटीटी वर येण्यास सज्ज; जाणून घ्या कुठे आणि कधी पाहू शकाल

=================================

नाग अश्विनच्या ‘कल्की 2898 एडी’ मध्ये प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हसन आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २७ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट कलयुगाच्या विनाशावर आधारित असेल. पुराणानुसार कलियुगात धर्मस्थापनेसाठी कल्की अवताराचा जन्म होणार असून ही कथा दाखविण्यात येणार आहे, जिथून अधर्माच्या दुष्टतेला सुरुवात होईल.