Skip to content Skip to sidebar Skip to footer

Vishal Pandey च्या आई-वडिलांनी मागितला बिग बॉसकडे न्याय, अरमानला घराबाहेर काढण्याची केली विनंती

टीव्हीचा सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस ओटीटी 3 सध्या चर्चेत आहे. या सीझनमध्ये सहभागी होणारे सर्वच स्पर्धक अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. दरम्यान, बिग बॉसच्या घरात शाब्दिक वादानंतर शारीरिक हल्ला झाला आहे. बिग बॉस 3 चा स्पर्धक अरमान मलिकने विशाल पांडेच्या काना खाली मारली आहे. अरमान मलिकच्या या कृत्यानंतर सोशल मीडिया युजर्सने त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली असून शो सोडण्याची ही चर्चा सुरू आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमकं अरमान मलिकने विशाल पांडेसोबत असं का केल. बिग बॉस ओटीटी 3 च्या वीकेंड वॉर एपिसोडमध्ये माजी स्पर्धक आणि अरमानची पहिली पत्नी पायल मलिक ने अचानक भेट दिली जिथे तिने अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिकवर केलेल्या कमेंटबद्दल विशालशी चर्चा केली.( Big Boss ott 3 Fight)

Big Boss ott 3 Fight
Big Boss ott 3 Fight

कृतिकाबद्दल तू जे बोललास ते चुकीचे आहे. खरं तर याआधीच्या एपिसोडमध्ये विशालने लवकेश कटारियाला सांगितलं होतं की, ”मला कृतिका भाभी खूप आवडते.आणि मला कृतिका आवडते आणि त्याबद्दल मला गिल्टी वाटते.”पायल गेल्यानंतर अरमान विशालशी या प्रकरणावर बोलायला गेला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. स्वत:चा बचाव करण्यासाठी विशालने पुन्हा लुकेशला सांगितलेल्या गोष्टीची पुनरावृत्ती करण्यास सांगितले. यानंतर अरमानला खुप राग येतो आणि ते विशालच्या काना खाली मारतो. त्यानंतर तो शिवीगाळ ही करताना दिसला आहे. तसेच विशाल आणि अरमान दोघेही एकमेकांच्या दिशेने धावण्याचा प्रयत्न करताना ही दिसले आहेत आणि इतर स्पर्धकांनी त्या दोघांना खेचून नेले.

Big Boss ott 3 Fight
Big Boss ott 3 Fight

खरंतर, बिग बॉसच्या घरात असे होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही शोमधून हिंसाचाराचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. जिथे स्पर्धकांनी एकमेकांवर हात उगारला आहे आणि त्यानंतर स्पर्धकाला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. अरमान मलिकच्या या कृत्याचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ही शेअर करण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर एका चाहत्यांना अरमान मलिकला घराबाहेर काढण्याची मागणी केली आहे.(Big Boss ott 3 Fight)

================================

हे देखील वाचा: Bigg Boss OTT 3 मध्ये येणार ट्वीस्ट; शोमध्ये होणार पहीली वाइल्ड कार्ड एंट्री!

================================

तर दुसरीकडे अरमानने विशालला काना खाली मारल्यापासून अनेक स्टार्स विशालच्या समर्थनार्थ पुढे आले असून चाहत्यांनी अरमानवर टीका केली आहे. आणि आता विशालच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाला न्याय मिळावा म्हणून अरमानला घराबाहेर काढण्याचे ही आवाहन केले आहे. बिग बॉस स्पर्धक विशाल पांडेच्या आई-वडिलांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मुलाला न्याय देण्याची मागणी केली आहे.व्हिडिओमध्ये विशालचे आई-वडील म्हणत आहेत की,, ‘प्लीज बिग बॉस, आम्ही तुम्हाला विनंती करतो की, ज्या व्यक्तीने आमच्या मुलावर हात उचलला आहे त्याला घराबाहेर काढा. आम्ही त्याला खूप प्रेमाने वाढवले आहे, बिग बॉसमध्ये कोणी तरी त्याच्यावर हात उचलेल असा विचार करून आम्ही त्याला पाठवले नाही.”