Skip to content Skip to sidebar Skip to footer

Vishal Pandey बिग बॉस ओटीटी ३च्या घरातून बाहेर? जिओ सिनेमाच्या पोस्टमुळे चाहत्यांचा गोंधळ

बिग बॉस ओटीटी ३‘चा फिनाले जवळ येत आहे. हा शो संपायला अवघे काही दिवसच आता शिल्लक राहिले आहेत. आणि त्यामिुळे ‘बिग बॉस ओटीटी ३‘ची ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाने कंबर कसली आहे. शोचा ग्रँड फिनाले जसजसा जवळ येत आहे तसतसा बिग बॉसच्या घरच वातावरण ही गरम होउ लागलं आहे. मंगळवारच्या एपिसोडमध्ये रणवीर शौरीला ‘कॅप्टन ऑफ द हाऊस‘ म्हणून निवडण्यात आलं. आणि त्यानंतर घरात एकामागोमाग एक गोष्टी घडू लागल्या आहेत. आता ‘बिग बॉस ओटीटी ३‘शी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विशाल पांडे बिग बॉसमधून बेघर झाला आहे. लव कटारिया विशालसोबत बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाला होतो पण आता त्या दोघांमध्ये विशाल पांडे बेघर झाला आहे. विशाल बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला या बातमीने त्याच्या चाहत्यांना ही मोठा धक्का बसला आहे. तर लव कटारियाने मात्र सुटकेचा श्वास घेतला आहे. विशालच्या बेघरपणाचा खुलासा एका पोस्टद्वारे करण्यात आला जी पोस्ट आता वेगाने व्हायरल ही होत आहे.( Big Boss Ott 3 Vishal Pandey)

Big Boss Ott 3 Vishal Pandey
Big Boss Ott 3 Vishal Pandey

ट्विटरवर ‘द खबरी’ने जिओ सिनेमाची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये स्पष्टपणे काहीही सांगण्यात आले नसले तरी जिओने शेअर केलेल्या पोस्टमध्ये विशाल पांडेचा फोटो आणि त्यावर एविक्टेड असे लिहिले आहे. बिग बॉसने घरच्यांना नॉमिनेशन टास्क दिला होता. ज्यात घराची दोन टीममध्ये विभागणी करण्यात आली होती. एक टीम अरमानची होती ज्यात कृतिका मलिक आणि सई केतन राव होते. या संघात नेजी, सना मकबूल, विशाल पांडे, लवकेश कटारिया आणि शिवानी कुमारी यांचा समावेश होता. इम्युनिटी टास्कमध्ये शिवानी सुरक्षित झाली. त्यामुळे विशाल पांडे आणि लवकेश कटारिया यांना या आठवड्यात बेघर होण्यासाठी नामांकित करण्यात आले होते. आणि अरमान मलिकला रणवीर शौरीने वाचवले.

Big Boss Ott 3 Vishal Pandey
Big Boss Ott 3 Vishal Pandey

पहिल्या टास्कनंतर बिग बॉसने घरच्यांना आणखी एक टास्क दिला ज्यात नॉमिनेट झालेले स्पर्धक स्वत:ला वाचवू शकतात. जो कोणी हा टास्क जिंकेल त्याला या आठवड्यात नॉमिनेशनद्वारे संरक्षण दिले जाईल असे होते. या टास्कचा परिणाम म्हणजे वीकेंड का वारमध्ये अनिल कपूर घोषणा करणार आहेत. ‘द खबरी’च्या रिपोर्टनुसार, वीकेंड का वारमध्ये शिवानी सुरक्षित झाली.(Big Boss Ott 3 Vishal Pandey)

===============================

हे देखील वाचा: Big Boss OTT 3: शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी बिग बॅास निर्माते आणि स्पर्धकांवर कारवाई करण्याची केली मागणी

===============================

रणवीर सध्या ‘हेड ऑफ द हाऊस‘ आहे. ज्याअंतर्गत त्याने अरमान मलिकला नॉमिनेशनपासून वाचवले आणि तीन जणांना नॉमिनेट केले. लवकेश, विशाल आणि शिवानी अशी या तिघांची नावे होती.