Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss OTT 3: अरमान मलिक आणि लवकेश कटारीया एकत्र घराबाहेर; चाहत्यांना ही बसला धक्का

जिओ सिनेमाचा लोकप्रिय शो ‘बिग बॉस ओटीटी ३’ सुरु झाल्यापासूनच चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक ट्विस्ट आले आणि निर्माते हा शो मोठा करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही असच दिसतय . ‘बिग बॉस ओटीटी ३‘चा ग्रँड फिनाले २ ऑगस्ट ला होणार आहे. या शोला टॉप 5 देखील मिळाले आहेत. मात्र, हा एपिसोड अद्याप दाखवण्यात आलेला नाही. लाइव्ह फीडही आता बंद करण्यात आली आहे. दरम्यान, आता अशी बातमी येत आहे की बिग बॉसच्या फिनालेला अवघे 2 आठवडे शिल्लक राहिले आहेत आणि यादरम्यान आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे आणि ‘बिग बॉस ओटीटी 3′च्या फिनालेपूर्वी दोन प्रसिद्ध स्पर्धकांना घराबाहेर काढण्यात आले आहे आणि ते दोघे जण अरमान मलिक आणि लवकेश कटारिया आहेत, जाणून घेऊयात नेमके हे प्रकरण आहे तरी काय.(Armaan Malik & Lavkesh Kataria Evicted)

Armaan Malik & Lavkesh Kataria Evicted
Armaan Malik & Lavkesh Kataria Evicted

बिग बॉस ओटीटी ३‘मध्ये विशाल पांडे आणि शिवानी कुमारी यांना घराबाहेर काढल्यानंतर घरात अरमान मलिक, लवकेश कटारिया, सना मकबूल, साई केतन, रणवीर शौरी, नेजी आणि कृतिका मलिक असे ७ सदस्य उरले होते. यानंतर आदल्या दिवशी या सगळ्यांमध्ये एक नॉमिनेशन टास्क झाला. घरातील सदस्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली होती. एका टीममध्ये लव, सना आणि साई होते तर दुसऱ्या टीममध्ये नेजी, कृतिका आणि रणवीर होते. अरमानला संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केलं जातं होत म्हणून त्याला संचालक बनवण्यात आलं.आणि लवच्या टीमने हा टास्क गमावला, त्यानंतर नॉमिनेशन मध्ये चार जण आले.त्यातील अरमान आणि लव आता घरातून बाहर निघाले असल्याच समजतय.  

Armaan Malik & Lavkesh Kataria Evicted
Armaan Malik & Lavkesh Kataria Evicted

बिग बॉसच्या क्षणोक्षणी बातम्या देणाऱ्या द खबरी या फॅन पेजने ही माहिती उघड केली आहे, विशालच्या घराबाहेर गेल्यानंतर युजर्सने विशालला एलिमिनेट करायला नको होतं अशी नाराजी व्यक्त केली होती, पण विशालनंतर बिग बॉसच्या घरातील त्याचा सर्वात हेट मिळत असलेला स्पर्धक अरमान ही बेघर झाला आहे.(Armaan Malik & Lavkesh Kataria Evicted)

===================================

हे देखील वाचा: ‘Big Boss Marathi’च्या घरात पार पडणार पहिलं नॉमिनेशन कार्य;अंकिता आणि निक्की यांच्यात होणार कडाक्याचं भांडण

===================================

रिपोर्ट्सनुसार, अरमान प्रेक्षकांची मतं न मिळाल्यामुळे  घरातून बाहेर गेला आहे. तर, अरमान बाहेर पडल्यानंतर लवकेश स्पर्धकांच्या मतानुसार बाहेर पडला आहे. हे दोघं घराबाहेर येताच आता या शोला सीझनचे टॉप 5 फायनलिस्ट मिळाले आहेत. त्यात सना मकबूल, रणवीर शौरी, नेझी, कृतिका मलिक आणि साई केतन यांचा समावेश आहे.