Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘सिरियल किलर’ भाऊ कदम ; ‘या’ दिवशी होणार नव्या नाटकाचा शुभारंभ

भाऊ कदम यांना कोणी ओळखत नाही असं होऊच शकत नाही. अभिनेते भाऊ कदम आणि विनोद  हे समीकरण पक्क असताना आता मात्र कॉमेडीचा हा शार्प शूटर ‘सिरियल  किलर’ ठरला आहे. अद्वैत थिएटर्स आणि सिंधु संकल्प एन्टरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत, राहूल भंडारे आणि प्रणय तेली निर्मित आणि केदार देसाई लिखित दिग्दर्शित ‘सिरियल किलर’ हे धमाल नाटक आज शनिवारी १२ ऑक्टोबरला रंगभूमीवर दाखल होत आहे. यात अभिनेता भाऊ कदम यांची मध्यवर्ती भूमिका असून त्यांच्या जोडीला अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा हांडे आणि तेजस पिंगुळकर या नाटकात धमाल उडवणार आहेत. आता पर्यंत भाउ कदम यांच्या विनोदाची कला टेलिव्हिजन आणि सिनेमात आपण पहिलीच आहे. मात्र नाटकात त्यांना विनोद करताना पाहण हे खरच तय पलीकडे असेल हे नक्की. (Bhau Kadam Serial Killer Marathi Natak)

Bhau Kadam Serial Killer Marathi Natak
Bhau Kadam Serial Killer Marathi Natak

मालिका अभिनेत्री आणि रिपोर्टर यांच्यामध्ये घडलेल्या घटनेने संशयाचे सुरुंग पेरले जातात. या घटनेनंतर ‘सिरियल  किलर’ म्हणून आलेला खरंच ‘सिरियल  किलर’ असतो की नसतो? याचा धमाल खेळ रंगतो. फुल टू कॉमेडीच्या रॅपरमध्ये  गुंडाळून आलेला ‘सिरियल किलर’ काय धमाल उडवतो हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.

Bhau Kadam Serial Killer Marathi Natak
Bhau Kadam Serial Killer Marathi Natak

बेभान कॉमेडी आणि निखळ आनंदासोबतच आमच्या सगळ्यांच्या भन्नाट ट्यूनिंगची ट्रीट देणारं ‘सिरियल किलर’ हे नाटक  प्रेक्षकांना निखळ आनंद  देईल’  असा विश्वास अभिनेते भाऊ कदम व्यक्त केला आहे. ‘नाट्यरसिकांना नेहमी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न अद्वैत थिएटर्सने  केला आहे. ‘सिरियल किलर’ च्या माध्यमातूनही आम्ही सस्पेंस धमाल अशी नाट्यकृती आणली असून भाऊ कदमच्या चाहत्यांसाठी हे नाटक मनोरंजनाची दिलखुलास पर्वणी असणार आहे’. (Bhau Kadam Serial Killer Marathi Natak)

==============================

हे देखील वाचा: राज ठाकरे यांच्या हस्ते वैशाली माडे म्युझिक ॲकडमीचे उद्घाटन

==============================

‘सिरियल किलर’ या नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी केले असून नाटकाचे संगीत विजय गवंडे यांचे आहे. आणि प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांची असूव. सूत्रधार सुनील पानकर आणि गोट्या सावंत हे आहेत.