Skip to content Skip to sidebar Skip to footer

Saif Ali Khan चोराच्या हल्ल्यात अभिनेता सैफ अली खान गंभीर जखमी

अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan ) घरात घुसून त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार सैफ अली खानच्या घरात दरोडेखोर घुसला आणि त्याने सैफवर चाकू हल्ला केला आहे. (Saif Ali Khan)

सैफ अली खान याच्या घरात घुसून एका चोराने त्याच्यावर हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. मागील काही दिवसांपासून चोर सैफ अली खानच्या घराची टेहाळणी करत होता. चोरीच्या उद्देशाने चोर १६ जानेवारीला रात्री त्याच्या घरात शिरला पण त्याची चाहूल लागली आणि घरामध्ये आरडा ओरड सुरू झाला. (Saif Ali Khan Attacked)

या हल्ल्यात त्याला सहा जखमा झाल्या आहेत, त्यापैकी दोन जखमा खोल आहेत. सैफच्या मानेला १० सेंटीमीटरची जखम झाली असून, त्याच्या पाठीवर आणि हातावरही मोठा वार करण्यात आला आहे. सैफ अली खानच्या पाठीवर चाकू खुपसल्याचे सांगितले जात आहे. तो चाकू शस्त्रक्रिया करुन बाहेर काढण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. (Bollywood News)

Saif Ali Khan

दरम्यान या प्रकरणाबद्दल मुंबई पोलिसांनी एक स्टेटमेंट जारी केले आहे. यात त्यांनी सांगितले की, सैफने पोलिसांना सांगितले की, तो घरी होता, तेव्हा त्याच्यावर कोणीतरी मागून हल्ला केला. त्या हल्ल्यात त्याला दुखापत झाली. सैफने त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरी त्याची मुलं आणि करिनाही होती. त्यांना वाचवण्यासाठी सैफ त्या व्यक्तीसोबत प्रतिकार करत होता. मात्र ओव्हरपावर करण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला दुखापत झाली. यामध्ये त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्यामुळे तो त्याला पकडू शकला नाही. (Saif Ali Khan News)

सैफ अली खानच्या टीमकडून देखील एक निवेदन जारी करण्यात आले आहे. एक चोर रात्री त्यांच्या घरी गेला आणि त्याच्या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून चाहत्यांनी संयम बाळगावा असे आवाहन त्याच्या टीमकडून करण्यात आले आहे. (Bollywood Tadka)

===============

हे देखील वाचा : Sidharth Malhotra मॉडेलिंग, सहाय्यक दिग्दर्शक ते बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता जाणून घ्या सिद्धार्थ मल्होत्राचा अभिनय प्रवास

===============

या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांची संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणी कुटुंबीयांचीही चौकशी केली जात आहे. या सर्व प्रकरणामध्ये चोर पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला असून, सध्या या चोराचा शोध पोलीस घेत आहे.