Skip to content Skip to sidebar Skip to footer

Rashmika Mandanna महाराणी येसूबाईंच्या अवतारातील रश्मिका मंदानाचे ‘छावा’ सिनेमातील फोटो व्हायरल

मागील अनेक दिवसांपासून विकी कौशलच्या ‘छावा‘ (Chhaava) सिनेमाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या सिनेमाचे पहिले पोस्टर समोर आल्यापासून सतत या सिनेमाच्याच चर्चा होताना दिसत आहे. सिनेमाचा ट्रेलर कधी येणार?, सिनेमा कधी प्रदर्शित होणार? आदी अनेक प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारले जात असतानाच, सिनेमातील मुख्य नायिका रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाई यांच्या रूपातील एक फोटो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Rashmika Mandanna)

मॅडॉक फिल्म्सने सोशल मीडियावर रश्मिकाचा लूक रिव्हिल केला आहे. ‘छावा’ चित्रपटातील रश्मिका मंदानाचा लूक इंस्टाग्रामवर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘प्रत्येक महान राजामागे, एक अतुलनीय मोठी शक्ती असलेली एक राणी उभी असते. स्वराज्याचा अभिमान महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना दिसणार आहे.’ अशी पोस्ट निर्मात्यांनी शेअर केली आहे. (Entertainment mix masala)

या पोस्टमध्ये निर्मात्यांनी रश्मिकाचे दोन फोटो शेअर केले आहे. एका फोटोमध्ये रश्मिका मंदाना हसताना आणि आनंदी दिसत आहे. या नवीन लूकमध्ये, रश्मिका महाराष्ट्रीय पारंपरिक भारदस्त दागिन्यांमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तर आणखी एक फोटो आहे ज्यामध्ये रश्मिका खूप गंभीर असल्याचे दिसून येत आहे. (Bollywood Masala)

View this post on Instagram

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

रश्मिकाचा हा महाराष्ट्रीय लूक फॅन्सला आणि नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे. कपाळावर मोठे कुंकू, महाराष्ट्रीयन पारंपरिक आणि लोकप्रिय दागिने, नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, भरजरी पैठणी साडी अश्या मराठमोळ्या लुकमध्ये रश्मिका खूपच शोभून दिसत आहे. तिचा हा लूक नेटकऱ्यांना आणि फॅन्सला खूपच आवडला असून तशा कमेंट्स देखील पोस्टवर आलेल्या पाहायला मिळत आहे.

दरम्यान ‘छावा’ हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज २२ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना या ट्रेलरची प्रतीक्षा होती. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचे चाहते हा ट्रेलर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

तत्पूर्वी लक्ष्मण उतेकर यांनी ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे निर्माते दिनेश विजन असून, ‘छावा’ चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांनी संगीत दिले आहे. ‘छावा’ चित्रपटात विकीचा दमदार अवतार चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये भरपूर अ‍ॅक्शन आणि युद्धाचे सीन्स चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत.

==========

हे देखील वाचा : Namrata Shirodkar मॉडलिंगमध्ये अव्वल असूनही अभिनयात फ्लॉप ठरली मराठमोळी नम्रता शिरोडकर

==========

छावा हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आहे. या सान्मातून संभाजी महाराजांचे आभाळाएवढे मोठे कर्तृत्व संपूर्ण जगाला पाहायला मिळणार आहे. संभाजी महाराज यांनी त्यांच्या वडिलांकडून मिळालेला स्वराज्याचा वारसा खंबीरपणे सांभाळला होता. या सिनेमाच्या निमित्ताने त्याचे कर्तृत्व आता संपूर्ण जग पाहणार आहे.