Skip to content Skip to sidebar Skip to footer

Jaat Release Date: सनी देओल आणि रणदीप हू़ड्डाचा अॅक्शनपॅक्ड ‘जाट’ चा धमाकेदार टीजर रिलीज…

Actor Randeep Hooda आणि Sunny Deol अभिनीत ‘जाट’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी नवीन टीझर रिलीज केला आहे. यात सनी देओल आपल्या गदर स्टाईलमध्ये पहायला मिळाला. तर अॅक्शनपॅक्ड सीन्समध्ये सनी देओल आणि रणदीप हुडा यांच्यात जोरदार लढत ही पाहायला मिळाली. सनी देओल ने इन्स्टाग्रामवर हा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो एका हॉलमध्ये दमदार एन्ट्री करतो आणि शत्रूंचा खातमा करतो.  एक्शन च्या  दरम्यान “मी जाट आहे.” अस ही ओरडताना दिसतो. दरम्यान, खलनायकाच्या भूमिकेत रणदीप हुडाही खुप प्रभावी दिसत आहे.(Sunny Deols Jaat Teaser)

Sunny Deols Jaat Teaser
Sunny Deols Jaat Teaser

टीझर शेअर करताना सनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जाट’ला बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण करण्यासाठी 30 दिवस शिल्लक आहेत. या क्रॅचवर चित्रपटगृहात आपले मनोरंजन करण्यास तयार आहे. येत्या १० एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘जाट’चे संपादन नवीन नूली यांनी केले आहे. या चित्रपटात स्फोटक अॅक्शन सीन्स आहेत, जे देशातील टॉप चार स्टंट कोरिओग्राफर्सनी तयार केले आहेत. राम-लक्ष्मण, व्ही. वेंकट, पीटर हेन आणि अनल अरसू यांनी स्टंटचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.(Sunny Deols Jaat Teaser)
==================================

हे देखील वाचा: Pintu Ki Pappi चित्रपटात सुप्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य साकारणार महत्त्वाची भूमिका

==================================

या आधी सोमवारी रणदीपने त्याच्या आगामी चित्रपटातील ‘रणतुंगा‘ मधल्या व्यक्तिरेखेची झलक दाखवली होती. दिग्दर्शक-अभिनेते गोपीचंद यांचा ‘जाट‘ हा चित्रपट तेलुगू आणि तमिळसह हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. अॅक्शन एंटरटेनर ‘ जाट ‘ मध्ये अभिनेता सनी देओल हा मुख्य भूमिकेत आहे.तर त्याच्यासोबत रणदीप हुडा, विनीत कुमार सिंह, रेजिना कॅसंड्रा, सैयामी खेर आणि स्वरूपा घोष हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे संगीत थमन यांनी दिले असून छायांकन ऋषी पंजाबी यांनी केले आहे. नृत्यदिग्दर्शन शोभी पॉलराज यांचे आहे. विवेक आनंद, निम्मगड्डा श्रीकांत, श्रीनिवास गविरेड्डी, मयुख आदित्य आणि कृष्णा हरी या पाच लेखकांच्या टीमने चित्रपटाची कथा तयार केली आहे.