Skip to content Skip to sidebar Skip to footer

India Pak Conflict : “शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ”, भारतीय सैन्यासोबत कलाकार उभे!

पहलगाम येथे निष्पाप भारतीय नागरिकांचे जीव घेतलेल्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ही मोहिम राबवली होती. यानंतरही पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाल्यामुळे ८ मे २०२५ पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले असून पाकिस्तान ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून भारतावर करणारे हल्ले भारतीय सैन्य परतवून लावत आहे. ऑपरेशन सिंदूरचे आणि सैन्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत असून कलाकारांनी देखील भारतीय सैन्याचं विशेष कौतुक आणि आभार मानले आहेत. (India Pakistan War)

मधुगंधा कुलकर्णी हिने तिरंग्याचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “जयहिंद! शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. देशभक्तीचं वार अंगात भरलं आहे. माझा देश, माझा अभिमान. बेंबीच्या देठा पासून ओरडावसं वाटतंय! वंदे मातरम्! आय लव्ह इंडिया.” (Entertainment news)

================================

हे देखील वाचा: Ind vs Pak conflict: “आपल्या देशाच्या खऱ्या हिरोंना सलाम”; कलाकारांनी केलं सैन्याचं कौतुक

=================================

श्रेयस तळपदेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “आजही नेहमीप्रमाणे मी आपल्यासाठी लढणाऱ्या शूर वीरांसाठी प्रार्थना करतो. ज्यांच्यामुळे आपण रात्री शांतपणे झोपू शकतो, नेहमीप्रमाणे कामावर जाऊ शकतो आणि आपल्या कुटुंबांसोबत राहू शकतो. माझ्या देशातील सर्व प्रभावित लोकांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. आपले सैन्य, आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुमच्या पाठीशी आहोत आणि आमच्या प्रार्थनेद्वारे तुम्हाला शक्ती पाठवत आहोत. जय हिंद!”. (Shreyas Talpade)