Skip to content Skip to sidebar Skip to footer

Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar: कीर्तनाच्या माध्यमातून होणार पर्यावरणाचा जागर! 

Kirtankar Ashwini Maharaj Tawhare: कीर्तन म्हणजे केवळ भक्तीचा प्रवाह नाही, तर समाजपरिवर्तनाची एक प्रभावी वाट आहे. कीर्तनातून मनोरंजन करता करता समाजाच्या मनामनात सकारात्मक विचारांची बीजं रोवण्याचं महत्त्वाचं कार्य आज अनेक कीर्तनकार करत आहेत. याच परंपरेत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे यांनी.(Kirtankar Ashwini Maharaj Tawhare)

Kirtankar Ashwini Maharaj Tawhare
Ashwini Maharaj Tawhare

पुणे जिल्ह्यातील बारामती येथे राहणाऱ्या अश्विनी टाव्हरे या मूळच्या इंग्रजी माध्यमातील शिक्षिका. अध्यात्म आणि पर्यावरण यांचा उत्तम समन्वय साधत त्यांनी कीर्तनकलेला एक सामाजिक रंग दिला आहे. कीर्तनासाठी गावोगाव फिरताना त्या तिथं एक झाडाचं रोप लावतात आणि त्याची जबाबदारी गावकऱ्यांवर सोपवतात. विशेष म्हणजे, पुढच्या वेळी त्याच गावात पुन्हा बोलावणं आलं तर त्या झाडाची निगा राखली आहे का याची खात्री करूनच कीर्तनाला होकार देतात!

Kirtankar Ashwini Maharaj Tawhare
Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar

ही केवळ परंपरा नाही, तर पर्यावरण जपण्याचा एक ठोस प्रयत्न आहे. “नकारात्मक गोष्टी घडत असल्या तरी त्यातील सकारात्मकतेकडे लक्ष देणं हे माझं ध्येय आहे,” असं त्या सांगतात. समाजाला विचारप्रवृत्त करणारं कीर्तन हे त्यांचं माध्यम आहे आणि पर्यावरणरक्षण ही त्यांची चळवळ! येत्या ५ जून – जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, या प्रेरणादायी कार्याची झलक ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोमध्ये पाहायला मिळणार आहे. अश्विनी टाव्हरे यांचा कीर्तन सादरीकरणाचा हा विशेष भाग प्रेक्षकांच्या मनाला निश्चितच भिडणारा ठरणार आहे. (Kirtankar Ashwini Maharaj Tawhare)

===================================

हे देखील वाचा: Laughter Chefs 2 ला रिप्लेस करायला येतोय ‘हा’ शो

===================================

कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार, सकाळी ८ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.आणि  कीर्तनात भक्ती आहे, विचार आहे आणि आता पर्यावरणाचे भानही… अश्विनी टाव्हरे यांचा हा अनोखा प्रवास पाहणं म्हणजे एक नवा दृष्टिकोन मिळवण्याचा अनुभव ठरणार आहे!