Skip to content Skip to sidebar Skip to footer

Salman Khan, Amitabh Bachchan की Kapil? ‘हा’ आहे छोट्या पडद्यावरील महागडा होस्ट !  

Highest Paid Television Host: सध्या टेलिव्हिजन वर रिअलिटी शोची चर्चा आहे आणि छोट्या पडद्यावर असे काही चेहरे आहेत, ज्यांच्याशिवाय रिअॅलिटी शोची कल्पनाही करता येत नाही. त्यांची उपस्थिती म्हणजे शोची खरी टीआरपी आणि ब्रँड व्हॅल्यू एकदम उंचावते. त्यामुळेच हे तारे त्यांच्या शो होस्टिंगसाठी कोट्यवधींची फी घेतात. या यादीत आघाडीवर आहेत सलमान खान, अमिताभ बच्चन आणि कपिल शर्मा. पण नेमकं यातल कोण आहे सर्वात जास्त मानधन घेणारा होस्ट? तुम्हाला माहीत आहे का? आज आपण ते जाणून घेऊयात. (Highest Paid Television Host)

Highest Paid Television Host

सर्वात आधी जाणून घेऊयात सलमान खानबद्दल,  रिअॅलिटी शो म्हटलं की लगेच आठवतो ‘बिग बॉस’ आणि त्याबरोबर अर्थात भाई जान म्हणजेच सलमान खान. गेली कित्येक वर्षं सलमान ‘बिग बॉस’या शोचा  प्रेक्षक प्रिय चेहरा ठरला आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस 18’ साठी सलमानने जवळपास ₹250 कोटींचा करार केला होता. एका एपिसोडसाठी त्यांना ₹6-7 कोटी इतकी फी मिळाली, आणि हा सीझन साधारण 4 महिने चालला.

Highest Paid Television Host

पुढच नाव आहे अमिताभ बच्चन यांच. ‘कौन बनेगा करोड़पति’ या शोच्या माध्यमातून गेली दोन दशकं अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावर घराघरांत पोहोचले आहेत. KBC च्या सीझन 16 साठी बिग बींनी एका एपिसोड साठी जवळपास ₹2.5 कोटी घेतल्याचं समजतं. ते दररोज दोन एपिसोड्स शूट करायचे, म्हणजेच एका दिवसाची त्यांची कमाई झाली ₹5 कोटी. या हिशोबाने त्यांनी सुमारे 150 एपिसोड केले आणि ₹375 कोटींचं मानधन मिळवलं. (Highest Paid Television Host)

=============================

हे देखील वाचा: शाहरुख खानच्या ‘मन्नत’ला टक्कर देणार Ranbeer-Alia च आलिशान घर; किंमत आहे थक्क करणारी !

==============================

आता बोलूयात कपिल शर्माबद्दल, कॉमेडीचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा कपिल शर्मा आपल्या विनोदी शैलीमुळे सगळ्यांचाच लाडका आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ साठी त्याने देखील आपल्या फीमध्ये वाढ केली आहे. रिपोर्ट्सनुसार, तो एका एपिसोडसाठी ₹5 कोटी घेतो. मात्र कपिल वर्षाला फक्त 25 एपिसोड्स करतो, त्यामुळे त्याची एकूण कमाई १२५ कोटी होते जी इतर दोघांपेक्षा कमी आहे.