Skip to content Skip to sidebar Skip to footer

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम Gaurav More लवकरच अडकणार लग्नबंधनात? स्वतः दिली कबुली…

Maharashtrachi Hasyajatra या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. हास्यजत्रेमधून त्याची अनुपस्थिती लक्षात येत असली, तरी चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दलची उत्सुकता आजही कायम आहे. विशेषतः, त्याच्या लग्नाविषयी चर्चेला उधाण आले असताना गौरव मोरेने एका मुलाखतीत त्यावर थेट भाष्य करत स्पष्ट संकेत दिले आहेत.(Gaurav More Wedding)

Gaurav More Wedding


मुलाखतीदरम्यान गौरवला त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं असता, त्याने आधी मिश्किलपणे “शनिवारी सांगतो!” असं उत्तर दिलं. पण काही क्षणांतच तो स्पष्टपणे म्हणाला की, “होईल कधी ना कधी. यावर्षी नाही, पण पुढच्या वर्षी करेन. अजून महिना किंवा तारीख ठरलेली नाही, पण होणार हे नक्की.” त्याच्या या मनमोकळ्या उत्तराने चाहत्यांमध्ये नव्याने उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Gaurav More Wedding

पण ती मुलगी कोण असणार याची ही चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. गौरव मोरे हास्यजत्रेमध्ये दिसत नसल्याने त्याच्या पुनरागमनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. त्यावर भाष्य करताना गौरव म्हणाला की सध्या त्याच्या पुनरागमनाची शक्यता फारशी नाही. तो वेब सिरीजच्या संधी शोधत असून, त्यासाठी स्वतःहून प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याचं लक्ष सध्या पूर्णपणे त्या दिशेने केंद्रीत झालं आहे. गौरव मोरे नुकताच ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ या सिनेमात झळकला होता. ११ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमात त्याच्यासोबत मिलिंद शिंदे, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, अभिजीत चव्हाण, संजय कुलकर्णी आणि चिन्मय उदगीरकर यांसारखे नामवंत कलाकार झळकले होते. या भूमिकेनंतर गौरवचं करिअर एक नवं वळण घेत असल्याचं स्पष्ट दिसून येतं.

============================

हे देखील वाचा: Sai Tamhankar ला करायच होत आमिर खान शी लग्न म्हणाली, ‘मी आमिरच्या ‘दिल… ‘

============================

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे गौरव मोरेचं नाव घराघरात पोहोचलं. त्याच्या खुमासदार अभिनय शैलीने प्रेक्षकांना मनमुराद हसवलं. त्याच्या नावासोबत आजही हास्यजत्रेतील स्किट्स, लग्नाचे प्रसंग, आणि त्याच्या बिनधास्त संवादशैलीची आठवण प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. त्यामुळेच त्याचं लग्न आणि पुढील प्रोजेक्ट्सबाबत नेहमीच उत्सुकता असते. गौरव मोरेच्या नव्या प्रवासाला आणि वैयक्तिक आयुष्यातील पुढील टप्प्याला चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तो लवकरच नव्या रुपात, नव्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येईल, अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे.तसेच त्याच लग्न तर पुढच्या वर्ष होणार पण ती मुलगी कोण याची ही चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.