Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या सुनेचे कांड; दीड कोटीची खंडणी घेताना रंगेहात पकडलं ! 

मराठी मनोरंजनविश्व सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असताना, एका अभिनेत्रीचा सहभाग थेट गुन्हेगारी प्रकरणात समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनेमातील कथानकाला शोभेल असा थरार प्रत्यक्षात मुंबईत घडला असून, गोरेगाव परिसरातून समोर आलेल्या या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईतील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाला तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने दोन महिलांना अटक केली आहे. या कारवाईत अटक झालेली मुख्य महिला आरोपी आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेतील कांचन देशमुखांच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्री अर्चना पाटकर (Archana Patkar) यांची सून आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गाजले आहे. अटक झालेल्या महिलांमध्ये हेमलता पाटकर (Hemlata Patkar) आणि अमरीना जव्हेरी या दोन महिलांचा समावेश आहे.(Hemlata Patkar Arrested)

Hemlata Patkar Arrested
Hemlata Patkar Arrested

गोरेगावमध्ये राहणारे बांधकाम व्यावसायिक अरविंद गोयल यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलावर दाखल असलेला गुन्हा “सेटल” करून देण्याचे आमिष दाखवून आरोपी महिलांनी त्यांच्याकडे प्रचंड रकमेची मागणी केली होती. पोलिसांशी जवळीक असल्याचा दावा करत, या दोघींनी गोयल कुटुंबावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र खंडणीखोरांसमोर न झुकता गोयल यांनी थेट गुन्हे शाखेशी संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ योजना आखत सापळा रचला आणि पहिल्या टप्प्यातील दीड कोटी रुपये स्वीकारताना दोन्ही महिलांना रंगेहाथ पकडले.

Hemlata Bane Arrested
Hemlata Bane Arrested

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, ३९ वर्षीय हेमलता आदित्य पाटकर (उर्फ बाणे) ही कांदिवली परिसरात राहणारी असून ती मराठी मनोरंजनसृष्टीत एक ओळखीचा चेहरा आहे. विशेष म्हणजे, एका लोकप्रिय मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ती सून आहे. तिच्यासोबत अटक करण्यात आलेली ३३ वर्षीय अमरिना इक्बाल झवेरी (उर्फ एलिस) ही सांताक्रूझची रहिवासी असून दोघींमध्ये घनिष्ठ मैत्री आहे.पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, हेमलतावर यापूर्वीही मारहाण, बेकायदेशीर प्रवेश आणि धमकावणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ती सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.(Hemlata Patkar Arrested)

=============================

हे देखील वाचा: साखरपुडयाच्या दुसऱ्याच दिवशी Dnyanada Ramtirthkar ने फोटो पोस्ट करत शेअर केली गुड न्यूज !

=============================

सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या कोठडीत असून, त्यांच्या हस्ताक्षर व आवाजाचे नमुने गोळा करण्याची प्रक्रिया बाकी आहे. याशिवाय, या दोघींनी याआधी अशाच प्रकारे इतर कोणाला गंडा घातला आहे का, किंवा या प्रकरणामागे आणखी कोणी सूत्रधार आहे का, याचाही तपास सुरू आहे. एकीकडे ग्लॅमर आणि प्रसिद्धी, तर दुसरीकडे कायद्याची पायमल्ली या विरोधाभासामुळे हे प्रकरण अधिकच लक्षवेधी ठरत आहे. १० कोटी रुपयांची खंडणी देण्याऐवजी कायद्यावर विश्वास ठेवणाऱ्या एका बिल्डरमुळे हा सारा प्रकार उघडकीस आला, आणि मराठी सिनेसृष्टीत मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!