Skip to content Skip to sidebar Skip to footer

 झी मराठीच्या लोकप्रिय अभिनेत्रीचे दमदार पुनरागमन; ‘Shubh Shravani’ मालिकेत साकारणार मुख्य भूमिका  

Zee Marathi वरील प्राइम टाइम मालिकांच्या वेळापत्रकात लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. यामागचं कारण म्हणजे वाहिनीवर सुरू होणारी नवी मालिका ‘शुभ श्रावणी’ (Shubh Shravani). नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून या मालिकेच्या प्रसारणाची तारीख आणि वेळ स्पष्ट करण्यात आली असून, त्यामुळे सध्या सुरू असलेल्या काही मालिकांच्या वेळेत फेरबदल होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.(Shubh Shravani Serial)

Shubh Shravani Serial
Shubh Shravani Serial

‘शुभ श्रावणी’ या मालिकेतून अभिनेत्री वल्लरी विराज (Vallari Viraj) छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. याआधी तिने झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ ( Navari Mile Hitlarla) मधून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या नव्या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता सुमित विजय ( Sumit Vijay) मुख्य भूमिकेत दिसणार असून, झी मराठीवर हा त्याचा पहिलाच मोठा प्रोजेक्ट ठरणार आहे. याशिवाय, ज्येष्ठ कलाकार लोकेश गुप्ते (Lokesh Gupteआणि आसावरी जोशी ( Asawari Joshi) यांचीही महत्त्वाची उपस्थिती या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Shubh Shravani Serial
Shubh Shravani Serial

कथेच्या केंद्रस्थानी असलेली ‘श्रावणी’ ही व्यक्तिरेखा अत्यंत वेगळ्या पार्श्वभूमीतून उभी राहते. वल्लरीने या भूमिकेबद्दल बोलताना सांगितलं की, श्रावणी ही शिक्षणमंत्र्याची मुलगी आहे. घरात संपत्ती, ऐश्वर्य आणि सर्व सोयी उपलब्ध असल्या तरी तिच्या आयुष्यात प्रेमळ वातावरणाचा अभाव आहे. आई नसलेली श्रावणी वडिलांशी भावनिकदृष्ट्या दूर आहे. वडील तिच्याशी का बोलत नाहीत, का तिच्याकडे कायम दुर्लक्ष करतात, याचं नेमकं कारण तिलाही माहित नाही, आणि हाच या कथेचा गाभा आहे. पुढे बोलताना वल्लरीने मालिकेशी जोडली जाण्याचा अनुभवही शेअर केला. ‘नवरी मिळे हिटलरला’ संपल्यानंतर झी मराठीने पुन्हा एकदा एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, असं ती सांगते. काही महिन्यांनंतर ‘शुभ श्रावणी’साठी थेट ऑफर आल्यावर तिने कोणताही विचार न करता ही भूमिका स्वीकारली. श्रावणीच्या व्यक्तिरेखेची खोली आणि कथा ऐकताच तिला या प्रोजेक्टसाठी होकार द्यावासा वाटला, असंही तिने स्पष्ट केलं. (Shubh Shravani Serial)

==============================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6 च्या घरात  गौतमी पाटील ची एंट्री? नव्या प्रोमोने चर्चांना उधाण!

==============================

नव्या कथानकासह, दमदार कलाकारांची फौज आणि भावनिक गुंतागुंत घेऊन येणारी ‘शुभ श्रावणी’ झी मराठीच्या मालिकाविश्वात नवा रंग भरणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर किती छाप सोडते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!