Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता Ruturaj Phadke दोन वर्षांनी कमबॅक करणार!

मालिका असो किंवा चित्रपटविश्व असो काही कलाकार सातत्याने कामं करताना दिसतात तर काही कलाकार २-३ कलाकृतींमधूनही प्रेक्षकांची मनं जिकतात. असाच छोट्या पडद्यावरील एक अभिनेता एका मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसला पण त्यानंतर तो कॅमेऱ्यापासून अचानक लांब गेला. आणि आता तब्बल २ वर्षांनी तो कमबॅक करत असून आपल्या चाहत्यांसाठी तो काहीतरी नवं घेऊन येणार आहे.तो आहे ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील अभिनेता ऋतुराज फडके (Ruturaj Phakde).

‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत ऋतुराज फडके याने कार्तिक ही नकारात्मक भूमिका साकारली होती. या मालिकेत जितकी इंद्राची भूमिका गाजली होती तितकीच कार्तिक ही भूमिका देखील प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरली होती. परंतु, त्यानंतर २ वर्ष त्याने टेलिव्हिजनला रामरामच केला होता. मात्र, आता प्रेक्षकांच्या प्रेमाखातर तो पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांसमोर येणार असून आता तो कोणत्या मालिकेत किंवा चित्रपटात काम करणार की अजूनही काही प्रेक्षकांच्या भेटीला आणणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. (Marathi Television Actors)

================================

हे देखील वाचा : ‘धुरंधर’नंतर Akshaye Khannaला नजर लागली? आणखी एका चित्रपटातून झाला पत्ता कट

================================

दरम्यान, ऋतुराज फडके याने मालिकांसोबतच चित्रपटांमध्ये छोटेखानी भूमिका केल्या होत्या. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’ (Dharmaveer 2) चित्रपटात तो झळकला होता. या व्यतिरिक्त ‘झोलझाल’ या चित्रपटात त्याने अजिंक्य देव, सयाजी शिंदे, मनोज जोशी, मंगेश देसाई, कुशल बद्रिके अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली होती. तसेच, ‘छापा काटा’, ‘LBW’ या कलाकृतींमध्येही तो दिसला होता. त्यामुळे आता ऋतुराज फडकेचं २ वर्षांनी कमबॅक नेमकी कोणत्या अवतारात होणार याची वाट त्याचे चाहते पाहात आहेत. (Marathi Entertainment News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!