Skip to content Skip to sidebar Skip to footer

Rajpal Yadav यांनी तिहार जेलमध्ये केलं सरेंडर; नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूडमधील लोकप्रिय विनोदी अभिनेते राजपाल यादव सध्या चेक बाऊन्स प्रकरणामुळे (Cheque Bounce Case) खास चर्चेत आहेत. या प्रकरणी राजपाल यांना दिल्ली उच्च न्यायालयानं ४ फेब्रुवारी रोजी सरेंडर करण्याचे आदेश दिले होते. आणि आता राजपाल यांनी आत्मसमर्पण केलं आहे. या प्रकरणादरम्यान, राजपालनं म्हटलं होतं की ते २५ लाख रुपये घेऊन आले असून उर्वरित रक्कमही लवकरात लवकर भरतील. न्यायालयाने याबद्दल त्यांना फटकारलं असून आता राजपाल यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला आहे. (Rajpal Yadhav)

राजपाल यादव यांना २०२४ मध्ये चेक बाउन्स प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. यादव यांनी एकूण २.५ कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, ज्यामध्ये ४० लाख आणि २.१० कोटींचा हफ्ता दिला जाणार होता. अंतिम मुदत असूनही, ही रक्कम जमा करण्यात न आल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Bollywood)

या प्रकरणी, उच्च न्यायालयानं असंही स्पष्ट केलं होतं की, राजपाल यांना वारंवार दिला जाणारा दिलासा हा वाद सोडवेल पण तसं झालं नाही आणि परिणामी ९ कोटी थकबाकी राहील्यामळे त्यांच्यावर पुढील कारवाईव करण्यात आली. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी तिहार तुरुंगात त्यांनी आत्मसमर्पण केलं. न्यायालयानं म्हटलं होतं की, “तुम्ही मुंबईत असल्याचं सांगितलं होतं, म्हणून तुम्हाला आत्मसमर्पण करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली. आता असं दिसतंय की, कोणताही आधार शिल्लक नाही. उदारता दाखवण्याचं कोणतंही कारण नाही…” (Entertainment News)

================================

हे देखील वाचा : राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो

================================

दरम्यान, राजपाल राजपाव यादवच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, राजपाल यादव ‘भूत बंगला’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome To The Jungle) या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दोन्ही चित्रपटांचं शूटिंग सुरू आहे. आता या प्रकरणाचा त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यावर काय परिणाम करणार? आणि चेक बाऊन्सप्रकरणातून त्यांची सुटका होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. (Rajpal Yadav News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!