Skip to content Skip to sidebar Skip to footer

Shahid Kapoor : “मला मराठीत काम करण्याची संधी मिळाली तर…”

अलीकडे अनेक बॉलिवूड कलाकार साऊथसह मराठी चित्रपटांचं विशेष कौतुक करताना दिसतात. सध्या शाहिद कपूर त्याच्या आगामी ओ रोमिओ चित्रपटामुळे खास चर्चेत आहे. विशाल भारद्वाज (Vishal Bharadwaj) दिग्दर्शित या चित्रपटाला प्रक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून शाहिदची भूमिका प्रेक्षकांना फार आवडली आहे. अशातच शाहिदने मराठी चित्रपटांबद्दल आपलं मत व्यक्त करत त्याला नक्कीच मराठी चित्रपटात काम करायला आवडेल असं म्हटलं आहे. (Shahid Kapoor)

शाहिद कपूर याने ‘मुंटा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, मला नक्कीच मराठी चित्रपटात काम करायला आवडेल. मला काही चित्रपट माहित आहेत आणि विशेष म्हणजे मराठी चित्रपटांचे विषय आणि आशय फार सुंदर असतात. पुढे मराठी भाषेबद्दल तो म्हणाला की, “कोणत्याही भाषेत काम करण्याआधी त्या भाषेवर प्रभुत्व मिळवणं माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. भविष्यात मला मराठीत काम करण्याची संधी मिळाली, तर मी सर्वात आधी मराठी भाषा नीट आत्मसात करेन आणि त्यानंतरच अभिनय करेन”. भाषेची जाण असल्याशिवाय भूमिकेला न्याय देता येत नाही, असा विश्वास शाहिदने व्यक्त केला. (O’Romeo Movie 2026)

दरम्यान, ‘ओ रोमिओ’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटात शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत असून विक्रांत मेस्सी, नाना पाटेकर, फरिदा जलाल यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. तसेच, चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत बोलायचं झालं तर पहिल्या दिवशी या चित्रपटाने ६.७५ कोटी कमावले आहेत. येत्या काळात नक्कीच हा चित्रपट सुपरहिट ठरेल अशी अपेक्षा आहे. (Entertainment News)

================================

हे देखील वाचा : Kareena Kapoor बॉलिवूडची अशी अभिनेत्री जी स्वत:चेच चित्रपट पाहात नाही….

================================

शाहिद कपूरच्या इतर कामांबद्दल बोलायचं झालंच तर, ‘इश्क विश्क’, ‘चुप चुप के’, ‘वाह लाईफ हो तो ऐसी’, ‘देवा’, ‘हैदर’, ‘जब वी मेट’, ‘कबीर सिंग’, ‘उडता पंजाब’, ‘कमिने’, ‘पद्मावत’, ‘पाठशाला’, ‘३६ चायना टाऊन’ अशा अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय कामं केली आहेत. (Shahid Kapoor Movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!