Skip to content Skip to sidebar Skip to footer

नाट्यप्रेमींसाठी पर्वणी ! जागतिक रंगभूमी दिनानिमित्त पुन्हा एकदा ‘तिसरी घंटा; ७५ हून अधिक गाजलेली नाटके आता ओटीटीवर

मराठी रंगभूमीची परंपरा ही केवळ नाट्यगृहांपुरती मर्यादित नसून ती पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांच्या मनात जपली गेलेली एक सांस्कृतिक ओळख आहे. आता हीच समृद्ध परंपरा डिजिटल माध्यमातून नव्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. अल्ट्रा झकास मराठी ओटीटी (Ultra Zakaas Marathi OTT) या प्लॅटफॉर्मवर ‘तिसरी घंटा, पुन्हा एकदा’ या उपक्रमाचा दुसरा पर्व २७ मार्चपासून सुरू होत असून, रंगभूमीप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तब्बल ७५ हून अधिक गाजलेली मराठी नाटके एकाच प्लॅटफॉर्मवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. मराठी नाटकांनी गेल्या अनेक दशकांमध्ये आपल्या प्रभावी कथानक, सहजसुंदर विनोद आणि हृदयस्पर्शी सादरीकरणामुळे एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. विशेषतः १९८० आणि ९० च्या दशकात दौऱ्यांमधून ही नाटके राज्यभर पोहोचली आणि नाटकांवर प्रेम करणारा मोठा प्रेक्षकवर्ग तयार झाला.(Marathi Natak on OTT)

Marathi Ranghbhumi Tisari Ghanta
Marathi Natak on OTT

याच सुवर्णकाळातील अनेक लोकप्रिय नाटके आता पुन्हा एकदा डिजिटल माध्यमातून अनुभवता येणार आहेत. ‘इथे लटकला श्याम’ आणि ‘ह्या नारी झाल्याच ना भारी’ यांसारख्या नाटकांनी रंगमंचावर गाजवलेली लोकप्रियता आजही कायम आहे. या नाटकांमधील कलाकार आणि संवाद अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात ताजे आहेत. आता हीच जादू नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. या विशेष संग्रहात विविध प्रकारच्या नाटकांचा समावेश करण्यात आला आहे. ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘यदा कदाचित’, ‘जाऊ बाई जोरात’, ‘बुवा तिथे बाया’, ‘गोपाळा रे गोपाळा’ आणि ‘फादर माझा गॉडफादर’ यांसारखी लोकप्रिय नाटके प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर ‘नवरा म्हणू नये आपला’, ‘चोर चोर चाळीत चोर’ आणि ‘धुमशान’ ही नाटकेही मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहेत.

Marathi Rangbhumi Tisari Ghanta
Marathi Natak on OTT

या संग्रहाची खासियत म्हणजे त्यातील विविधता. हलक्याफुलक्या विनोदी नाटकांपासून ते भावनिक आणि सामाजिक आशय असलेल्या कथांपर्यंत सर्व प्रकारचे विषय यात पाहायला मिळतात. ‘मिस्टर खोटे खरे बोला’, ‘बोल बच्चन’ आणि ‘डिटेक्टिव्ह चंगू मंगू’ ही नाटके प्रेक्षकांना खळखळून हसवतील, तर ‘सासू वरचढ जावई’, ‘माझा पती करोडपती’ आणि ‘आमच्या या घरात’ ही नाटके कौटुंबिक नातेसंबंधांवर हलक्या शैलीत भाष्य करतात. याशिवाय ‘अधांतर’, ‘मनोमनी’, ‘निष्पाप’ आणि ‘तू तसा मी’ यांसारखी नाटके भावनिक पैलू प्रभावीपणे मांडतात. (Marathi Natak on OTT)

===================================

हे देखील वाचा: Carry On Spying Marathi Drama: ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ने रंगमंच गाजणार; भरत दाभोळकरांची मराठीत दमदार एन्ट्री !

===================================

या उपक्रमाबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. (Ultra Media and Entertainment Pvt Ltd) चे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी मराठी रंगभूमीला आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचं सांगत, या माध्यमातून हा वारसा जतन करण्याचा आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं नमूद केलं आहे. आजच्या डिजिटल युगात कंटेंटचे असंख्य पर्याय उपलब्ध असले, तरी आशयघन आणि दर्जेदार नाटकांची ओढ प्रेक्षकांमध्ये कायम आहे. ‘तिसरी घंटा, पुन्हा एकदा’ या उपक्रमामुळे ही ओढ आणखी वाढेल आणि घरबसल्या रंगमंचाचा अनुभव घेण्याची एक नवी दारं उघडतील. २७ मार्चपासून सुरू होणारा हा उपक्रम म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगमच ठरणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!