Skip to content Skip to sidebar Skip to footer

Abhanga Tukaram Movie: अजिंक्य राऊत दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत 

काही कलाकारांनी त्यांची भूमिका आणि अभिनयाच्या कलेतून इतिहासाच्या पानांवर जिवंत व्यक्तिमत्त्वं आणली आहेत, आणि आता याच परंपरेला पुढे नेत अभिनेता अजिंक्य राऊत आपल्या करिअरच्या नव्या टप्प्यावर येत आहे. आगामी ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात अजिंक्य राऊत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तरुण रूपाची भूमिका साकारत आहेत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या या ऐतिहासिक चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट ७ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कथा भारतीय इतिहासाच्या एका महत्त्वपूर्ण आणि अध्यात्मिक आयामावर आधारित आहे. ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट संत तुकाराम यांच्या जीवनावर आधारित असून, त्यामध्ये त्यांच्या अभंगांमधून मिळणाऱ्या जीवनाच्या अर्थपूर्णतेचा आणि अध्यात्मिकतेचा सुंदर संदेश दर्शविला जाणार आहे . अजिंक्य राऊत ज्याने आतापर्यंत  विविध सिनेमे आणि मालिका मधून प्रेक्षकांचा मनोरंजन केले आहे या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. शिवाजी महाराज हे अजिंक्यचे आराध्य दैवत असल्याने त्याच्या भूमिकेविषयी तो अत्यंत गर्व आणि आदर व्यक्त करतो. (Abhanga Tukaram Marathi Movie)

Abhanga Tukaram Marathi Movie

अजिंक्य राऊत म्हणाला , “छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी अत्यंत भाग्याचे आणि अभिमानास्पद आहे. या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाची भूमिका निभावत असताना, ती करतांना एक जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे. त्यासाठी चित्रपटाच्या सर्व टीमने मला भरपूर सहकार्य दिले.” अजिंक्य राऊत याच्या अभिनयामुळे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रभावी आणि प्रेरणादायक चित्रण होईल, अशी अपेक्षा आहे.

Abhanga Tukaram Marathi Movie

चित्रपटाची निर्मिती पॅनोरमा स्टुडिओजच्या प्रमुख संस्थांनी केली आहे. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, अजय अशोक पूरकर आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आहेत. सहनिर्मात्या मुरलीधर छतवानी आणि रवींद्र औटी यांच्या योगदानामुळे चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. संदीप शिंदे यांनी छायांकनाची जबाबदारी घेतली आहे, तर संकलन सागर शिंदे आणि विनय शिंदे यांनी केले आहे.(Abhanga Tukaram Marathi Movie)

==============================

हे देखील वाचा: 50 वर्ष जुन्या ‘दिसला गं बाई दिसला’ लावणीवर थिरकली Gautami Patil; ललित प्रभाकरची ही मिळाली साथ…

==============================

‘अभंग तुकाराम’ हा एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चित्रपट आहे, जो शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकेल. अजिंक्य राऊत यांच्या अभिनयाची ही नविन भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, तसेच दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या सादरीकरणामुळे चित्रपटाचे सर्व बाबी प्रेक्षकांच्या मनावर ठसा बसवतील. 7 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल, आणि त्याला प्रेक्षकांचा प्रेम आणि प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.