Skip to content Skip to sidebar Skip to footer

अभिज्ञा भावेचे क्लासी फोटोशूट

Abhidnya Bhave

मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून अभिज्ञा भावेला ओळखले जाते. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले असून तिला मोठी फॅन फॉलोविंग आहे.

Abhidnya Bhave

‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘तुला पाहते रे’ यांसारख्या हिट मालिकांमध्ये काम केले आणि ती घराघरांत पोहोचलेली.

Abhidnya Bhave

सोशल मीडियावरही अभिज्ञा कमालीची सक्रिय आहे. ती सतत विविध पोस्ट शेअर करत फॅन्सच्या संपर्कात असते.

Abhidnya Bhave

नुकतेच अभिंज्ञाने एक ग्लॅमरस फोटोशूट केले असून, यातले काही फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमाल सुंदर दिसत असून, तिने काळ्या रंगाचा लेदरचा शॉर्ट ड्रेस घातलेला असून यात तिचा अंदाज, तिच्या अदा घायाळ करणाऱ्या आहेत.

Abhidnya Bhave

या लूकमध्ये अभिज्ञाने अतिशय साधा मात्र आकर्षक मेकअप केला आहे. तिचा सर्व मेकअप न्यूड असून लिपस्टिक ग्लॉसी लावलेली दिसत आहे. तिने तिचा हा लूक गॉगल घालून पूर्ण केला आहे. अभिज्ञाच्या या फोटोसोबतच तिने दिलेल्या कॅप्शनची देखील चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. ‘कॅप्शन नाही फोटो बघा’ असे तिने हे फोटो शेअर करताना लिहिले आहे.

Abhidnya Bhave

एयरहोस्टेस असणाऱ्या अभिज्ञाने अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी तिचा चांगला जॉब सोडला आणि या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. लगोरी मैत्री रिटर्न्स, खुलता कळी खुलेना, तुला पाहते रे, चला हवा येऊ द्या, रंग माझा वेगळा, बावरा दिल,
तू तेव्हा तशी आदी मालिकांमध्ये तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिज्ञाला बहुतकरून तिच्या खलनायकी भूमिकांसाठी ओळखले जाते.