
Abhidnya Bhave : “साऊथ फिल्म कशाही असूदेत लोकं पाहतात पण, मराठी…”
चित्रपट, वेब सीरीज किंवा अन्य कोणत्याही पद्धतीचा कंटेन्ट घरबसल्या पाहण्यासाठी आता आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. वेगवेगळ्या ओटीटी वाहिन्या आपल्या बोटांवर आल्या असून जगभरातील कुटल्याही भाषेतील कंटेन्ट आपण पाहू शकतो. अलीकडच्या काळात कोरीअन सीरीज किंवा चित्रपट आणि दाक्षिमात्य चित्रपट, वेब सीरीज मो्या प्रमाणात पाहिल्या जात आहेत. त्यासोबतच इतर भाषेतील अनेक कलाकारही दाक्षिणात्य कलाकृतींचा भाग होताना दिसतायत. हिंदीसह काही मराठी कलाकारही तमिळ, तेलुग चित्रपटांचा भाग झालेले दिसतात. पण जितकं ग्लॅमर किंवा महत्व हिंदी कलाकारांना मिळतं तितकं मराठी कलाकारांना मिळत नाही अशी खदखद कायमच व्यक्त केली जाते आणि त्याचा पुनरुच्चार अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने केला आहे. (Abhidnya Bhave)
मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावेने ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’, ‘तू तेव्हा तशी’, ‘रंग माझा वेगळा’ अशा अनेक मालिकांमध्ये विविधांगी भूमिका केल्या. छोट्या पडद्यावरच्या बहुतांश मालिकांमध्ये अभिज्ञाने खलनायिकेच्या ठसठशीत भूमिका साकारत आपलं स्थान निर्माण केलं. काही दिवसांपूर्वी तिने प्रसिद्ध निर्मात्या अमृता राव यांच्या मुलाखतीला हजेरीलावली होती. यावेळी तिने मराठी चित्रपसृष्टीबद्दल आपलं स्पष्ट मत मांडलं. (Marathi film news)

अभिज्ञा (Abhidnya Bhave) म्हणाली की, “साऊथमध्ये मराठी इंडस्ट्रीचा विषय का काढला जात नाही? मराठीत आपल्याकडे अनेक सुंदर आणि उत्तम संकल्पना आहेत, इतके चांगले कलाकार आणि विषय आहेत, माझ्यामते देशातली प्रत्येक इंडस्ट्री मराठी कलाकारांचं कौतुक करते. मराठी कलाकार म्हटलं की कॉलर टाइट असते. पण, आज जेव्हा मला हिंदीमधून कामासाठी कॉल येतात तेव्हा मला बोललं जातं की, मॅम आमचं बजेट एवढं नाहीये. कारण, त्यांना माहितीये की, मराठी कलाकार नेहमी पैशांपेक्षा जास्त प्राधान्य कलेला देतात.” (South Film Industry)
===========
हे देखील वाचा : Sidharth Chandekar “जिथे ओलावा होता, तिथे….” सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला नात्यांवर आधारित कवितेचा व्हिडिओ
===========
पुढे ती म्हणाली, “आज जर प्रेक्षक म्हणून तुम्ही फक्त साऊथ चित्रपट पाहाताय मग तो चित्रपट कसाही असला तरी लोकं पाहायला जातात. पण, या सगळ्यात मराठी चित्रपटांचं बुकिंगचं तुम्ही केलं नाहीत तर कसं होईल? मराठी चित्रपटांना ५०० रुपये कोण देणार असा विचार जर का तुम्ही केलात, तर मराठी माणूस म्हणून आपण प्रगती कशी करणार? मला असं वाटतं की, मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे, तुम्ही मराठीत बोला यापेक्षा पुढे जाऊन सर्वात आधी प्रेक्षकांनी मराठी चित्रपट पाहिला पाहिजे. त्यानंतर या सगळ्या गोष्टी येतात. जर तुम्हाला तुमच्या इंडस्ट्रीत काय सुरूये, तुमची लोकं काय करतायत याचं कौतुक नाहीये मग मी इतरांकडून काय अपेक्षा करणार? एक निर्माता, दिग्दर्शक म्हणून तुम्हाला मराठी कलाकारांचं कौतुक नाहीये पण, त्यापेक्षा दहा पट पैसे देऊन तुम्ही एखादा हिंदी चेहरा घेऊन येता तर हे नक्की काय सुरूये असा विचार मनात नक्कीच येतो.” (Bollywood industry)
पुढे अधिक परखडपणे आपलं मत मांडताना अभिज्ञा म्हणाली की,“मला असं खूप वाटतं, कदाचित माझं हे विधान खूप वेगळं असावं. पण, मला असे खूप अनुभव आलेत की, आपली माणसं आपल्याला खाली खेचतात. आपल्या माणसांना आपली प्रगती बघवत नाही ते लोक आपल्याच फसवतात.” (Entertainment News)
मराी चित्रपट पाहायला प्रेक्षक नाहीये, मराठी चित्रपट चांगल्या दर्जाच्या नसतात किंवा संहिता, कलाकार यांच्यात तोचतोचपणा दिसतो अशा अनेक तक्रारी प्रेक्षक करत असतात. पण जर का मराी चित्रपटांना प्रेक्षक नसेल तर चित्रपटसृष्टी तग कसा धरु शकेल? हा प्रश्न उभा राहतो शिवाय जर का प्रेक्षकांना ज्या कलाकृती पाहायला आवडतात त्या जर का फिल्म मेकर्सने दाखवल्या नाहीत तर मग प्रेक्षक इतर भाषिक चित्रपटांना अधिक प्राधान्य देईल ही वर्तमानकाळातील कटू सत्यता जर का स्वीकारली आणि त्यावर मेहनत करुन चांगले प्रोजेक्ट भेटीला आणले तर नक्कीच पुन्हा एकदा मराठी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळेल. (Abhidnya Bhave)