Skip to content Skip to sidebar Skip to footer

Gauahar Khan: वयाच्या 39 व्या वर्षी गौहर खानने दिला गोंडस मुलाला जन्म 

गौहर खान आणि जैद दरबार यांच्या घरी मुलगा जन्म झाला आहे. टीव्ही मालिका स्टार आणि बिग बॉसचा एक्स विनर गौहर ने आपल्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून तिच्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. गौहर खानने एका मुलाला जन्म दिला आहे. गौहर खानने पोस्ट मध्ये म्हटले आहे की, 10 मे रोजी तिने मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मापासून संपूर्ण कुटुंब आनंदात बुडालेले आहे. अनुष्का शर्मासह अनेक सेलिब्रिटींनी गौहरला आई झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. गौहर खानने 10 मे रोजी मुंबईतील एका रुग्णालयात आपल्या गोंडस मुलाला जन्म दिला आहे.अभिनेत्री गौहर खानने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लिहिले की, “हा एक मुलगा आहे, खरोखरच 10 मे 2023 रोजी आम्हाला आनंदाची खरी अनुभूती मिळाली आहे. आमचा मुलगा सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद देतो.(Gauahar Khan)

Gauahar Khan
Gauahar Khan

गौहर खान गेल्या काही महिन्यांपासून तिच्या घरी प्रेग्नन्सी पीरियड एन्जॉय करत होती. गौहर सतत तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. गौहर खानने 25 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद दरबारसोबत लग्न केले होते.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या दोघांनी आपल्या मातृत्वाची बातमी एका मनमोहक, अॅनिमेटेड व्हिडिओद्वारे जाहीर केली होती आणि मजेशीर व्हिडिओमध्ये लिहिले होते की, “जेव्हा झेड जीला भेटले तेव्हा एकाचे दोन झाले. आम्ही लवकरच तीन होऊ. या सुंदर प्रवासात सर्वांच्या प्रार्थना आणि आशीर्वाद राहुदया .गौहर खान बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीचा भाग आहे आणि इश्कजादे, रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर, बेगम जान यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे, तिने झलक दिखला जा 3, बिग बॉस 7 आणि खतरों के खिलाडी 5 सारख्या रिअॅलिटी शोमध्येदेखील भाग घेतला आहे. ही अभिनेत्री हिट वादग्रस्त शो बिग बॉस 7 ची विजेती सुद्धा ठरली आहे. 

Gauahar Khan
Gauahar Khan

गौहर खानने 25 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद दरबारसोबत लग्न केले होते. गौहर खानने तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या जैद दरबारसोबत लग्न केले होते. गौहर खान आणि जैद यांची भेट एका सुपरमार्केटमध्ये झाली होती. इथल्या पहिल्या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली. दोघांनी नंबरची देवाणघेवाण केली आणि बोलायला सुरुवात केली. काही दिवस बोलल्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. यानंतर दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.(Gauahar Khan)

================================

हे देखील वाचा: श्वेता तिवारीच्या दुसऱ्या गरोदरपणाची बातमी ऐकून पलकला बसला होता धक्का

================================

गौहर खान टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.तिने बिग बॉसमध्ये आल्यानंतर आणि प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन केले होते. याशिवाय गौहरचा नवरा जैद हा डान्सर आहे. जैदसोबत डान्स करताना गौहर खानने तिच्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ ही शेअर केले आहेत.