Skip to content Skip to sidebar Skip to footer

तब्बल ६ वर्षानंतर प्राजक्ता माळीची छोट्या पडद्यावर एंट्री, ‘या’ मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका !

मराठी सिनेसृष्टीत सुंदर, देखणी आणि आपल्या  अदांनी सर्वांना घायाळ  करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. काही वर्षांपूर्वी मराठी मालिकांमधून काम करत प्राजक्ता घराघरात पोहचली आणि तिने तेव्हापासूनच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. मालिका, चित्रपट, आणि सिनेमा या तिन्ही माध्यमात काम करून प्राजक्ताने स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे. प्राजक्ताने अल्पावधीतच मनोरंजन क्षेत्रात तीच वेगळ स्थान निर्माण केलेले आहे. त्याबरोबर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी ही ती उत्तम रित्या पार पाडत आहे. या कार्यक्रमाचा ती सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. प्राजक्ता अभिनय करताना शेवटची दिसली ते वेबसिरजच्या मध्यमातूनच. रान बाजार या वेबसिरजममध्ये तिने वेश्याचे पात्र साकारले होते आणि तिच्या भूमिकेच बरच कौतुक ही झाल होत. आता पुन्हा ती मालिकांमध्ये कधी दिसणार या प्रतीक्षेत तिचे चाहते आहेत, याच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.(Actress Prajakta Mali)

Actress Prajakta Mali
Actress Prajakta Mali

तब्बल ६ वर्षांची प्राजक्ता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘पोस्ट ऑफिस उघड आहे’ या मालिकेतून प्राजक्ता पुन्हा एकदा प्रेक्षकांच मनोरंजन करण्यसाठी सज्ज झाली आहे. सोनी मराठी वाहिनीने या मालिकेचा एक व्हाडीओ शेअर केला आहे ज्यात प्रजाक्ताची झलक पाहायला मिळतेय. या व्हिडिओत ”दिसायला गोड, स्वभावाने कडक, पोस्ट ऑफीसमध्ये पूजा येणार बेधडक!” अस कॅप्शन ही देण्यात आलेले आहे. अनेक नेटकरी त्या व्हिडीओखाली कमेंट करत प्राजक्ताच अभिनंदन करत आहेत. पारगाव पोस्टात तिच्या येण्यामुळे आता काय धमाल होणार हे पाहण्याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

Actress Prajakta Mali
Actress Prajakta Mali

प्राजक्ताने जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतुन छोट्या पडद्यावर अभिनयची सुरुवात केली. त्यानंतर बंध रेश्माचे, सुवासिनी, सुगरण, गाणे तुमचे आमचे या टीव्ही शोमध्ये सुद्धा तिने अभिनय केला आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली या भाषांमध्ये ही तिने काम केले आहे.(Actress Prajakta Mali)

(हे देखील वाचा: मालिकांमधील बोलीभाषांचं वैविध्य)

काही दिवसांपूर्णी प्राजक्ताने स्वतःचा व्यवसाय ही सुरु केला. तिने स्वतःचा ज्वेलरी ब्रँडसुरु केला आहे. प्राजक्तराज अस त्या ब्रँडचे नाव असून अनेक वेगवगेळ्या प्रकारचे दागिने यात बनवले जातात. या ब्रँडच्या लॉन्चसाठी खास राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर प्राजक्ता राजकारणात प्रवेश करणार का यावरच चर्चा रंगायला लागली होती. मात्र प्राजक्ताने या सर्व चर्चांना पूर्णविराम देत तिचा असा कोणताही प्लॅन नसल्याच सांगितले होते. प्राजक्ता सोशल मीडियावर बरीच एक्टिव झाली असून ती अनेकदा तिच्या दागिन्यांच ब्रॅंडिंग करताना दिसते.