Skip to content Skip to sidebar Skip to footer

बॉलीवुड मध्ये एंट्री करताच शेहनाज गिल ने घेतल नवं घर; अभिनेत्रीवर होतोय कौतुकाचा वर्षाव 

हिंदी बिग बॉस मध्ये सहभाग घेतलेले असे काही कलाकार आहेत ज्यांचे बिग बॉस नंतर सगळचं आयुष्यच बदलून गेल. प्रेक्षकांनी अक्षरशः त्यांना डोक्यावर घेतलं. त्यातलेच एक नाव म्हणजे शेहनाज गिल, काही दिवसांपूर्वीच शेहनाजचा पहिला बॉलीवुड सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’ रिलीज झाला. या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी बिग बॉस 13 फेम शहनाज गिलने तिच्या कुटुंबाला एक मोठे सरप्राईज दिले आहे. सोशल मीडियावर सुद्धा नेटकरी आता शेहनाज गिलचे अभिनंदन करत आहेत. शहनाज गिल सध्या सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’ या मल्टीस्टारर चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे.(Shehnaaz Gill)

Shehnaaz Gill
Shehnaaz Gill

आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी चाहत्यांकडून प्रेम मिळाल्यानंतर शहनाज खूप खुश आहे, आणि नुकतीच तिने आपल्या चाहत्यांना सांगितले की, ती आता एका घराची मालकीन बनली आहे. शेहनाज ने नुकतेच एक घर खरेदी केल आहे, आणि म्हणूनच तिचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांचे मेसेज शेअर केले आहेत. चाहत्यांनी तिचे केवळ अभिनंदनच केले नाही, तर तिला आपली प्रेरणा देखील म्हटले आहे. शहनाजने तिच्या सर्व चाहत्यांचे प्रेमाबद्दल आभार मानले आहेत. नुकतेच फेब्रुवारी महिन्यात शेहनाजने आपल्या चॅट शोमध्ये भुवन बामच्या एका एपिसोडमध्ये सांगितले होते की, ती आपल्या घराबद्दल आणि स्वच्छतेबद्दल किती सिरिअस आहे. तिने व्हिडिओमध्ये सांगितले होते की, ती स्वत: घराची साफसफाई करते आणि सर्व कामे करते. इतकंच नाही तर कुणीही आपलं वॉशरूम वापरणं तिला आवडत नाही. जर कुणाला तिच्या बेडवर झोपायचं असेल तर त्या व्यक्तीला आधी अंघोळ करावी लागते. अस ही तिने त्या व्हिडीओमध्ये सांगितले होते. तिच्या याच सवयीमुळे एकदा तिचा भाऊ शेहबाज म्हणाला होता की, जर  यायच असेल तर त्यांनी वाशरूम साठी एक हॉटेल रूम ही बुक करा.

Shehnaaz Gill
Shehnaaz Gill

‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकलेली शहनाज गिलला लवकरच अनेक चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शहनाज गिलने चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. चाहते तिला ‘पंजाबची कतरिना’ अस ही म्हणतात, फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी का जान’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, ज्यात सलमान खान, पूजा हेगडे, राघव जुयाल व्यंकटेश आणि जगपती बाबू यांच्याप्रमुख भूमिका आहेत.(Shehnaaz Gill)

========================================

हे देखील वाचा: ए.आर.रेहमानची लाइव्ह कॉन्सर्ट पुणे पोलिसांनी मध्येच का थांबवली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण 

========================================

शेहनाज सोशल मीडियावर खुप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर शेहनाज ने स्वतःवर शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टींवर खुप मेहनत घेतली. तिने खुप वजन कमी केल, आज ही तिच्या इथपर्यंतच्या प्रवासाच तिचे चाहते कौतुक करत असतात.