Skip to content Skip to sidebar Skip to footer

गाथा नवनाथांची मालिकेत अभिनेत्री सोनाली पाटील साकारणार अक्काबाईचे पात्र…

सोनी मराठी वाहिनीवरील नवनाथांची कथा उलगडून दाखविणारी ‘गाथा नवनाथांची‘ ही पौराणिक मालिका लवकरच ९०० भागांचा टप्पा पार करणार आहे. यामध्ये आत्तापर्यंत नवनाथांपैकी सात नाथांचा अवतार, त्यांचा प्रवास आणि लीला हे सर्व दाखवण्यात आले आहे. सध्या नागनाथांचा प्रवास व त्यांचे चमत्कार प्रेक्षक भक्तांना पाहायला मिळत आहेत. मालिकेत एकीकडे नाथांचा नकारात्मक गोष्टींविरुद्ध लढा सुरू आहे तर एकीकडे नागनाथ आणि भर्तरीनाथ यांचावर होणारे संस्कार पाहायला मिळताहेत. पण आता मालिकेत दिसणार आहे अक्काबाई ही नकारात्मक व्यक्तिरेखा.(Actress Sonali Patil)

Actress Sonali Patil
Actress Sonali Patil

अक्काबाई ही नाथांविरोधात उभी राहणार असून नाथांच्या पुढील कार्यात ती अडथळा निर्माण करणार आहे. अक्काबाईच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी सोनाली पाटील आता नव्या भूमिकेत येणार आहे. गाथा नवनाथांची मालिकेतून अक्काबाई हे पात्र ती साकारणार आहे. तिच्या अभिनयाच्या छटा प्रेक्षकांना या मालिकेतून नक्की अनुभवता येतील.

Actress Sonali Patil
Actress Sonali Patil

अक्काबाईच्या येण्याने नाथांच्या पुढील कार्यात मोठे अडथळे तयार होणार आहेत. अक्काबाई ही अघोरी स्त्री आहे. ती गावकऱ्यांना आपल्या बाजूला करून घेणार आहे आणि नाथांच्या विरुद्ध कट रचणार आहे. त्यामुळे नाथांच्या कार्यात नक्कीच अडथळे तयार होतील. नाथांचे कार्य हे चांगली शिकवण देणे आणि नाथ परंपरा कायम ठेवणे हे आहे. पण आता अक्काबाईच्या गावात येण्याने भरपूर अडथळे निर्माण होतील. नाथ तिला कसे सामोरे जाणार, हे प्रेक्षकांना आता मालिकेत नक्कीच पाहायला मिळेल. (Actress Sonali Patil)

=============================

हे देखील वाचा: Yed Lagal Premach Serial: ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील अभिनेत्री पुजा बिरारी सांगितला बैलगाडा शर्यतीचा सीन शुट करण्याचा अनुभव

=============================

‘गाथा नवनाथांची’ ही मालिका सुरु झाल्यापासूनच या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. नाथ संप्रदाय आणि त्याविषयी माहिती प्रेक्षकांना या मालिकेच्या माध्यमातून मिळते आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ यांसारख्या नवनाथांच्या कथा प्रेक्षकांना समजताय. या मालिकेला एक वर्ष पूर्ण झाले असून मालिकेने प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच खूप, माहिती देखील दिली आहे.’गाथा नवनाथांची’ ही मालिका आपल्याला सोम. ते शनि. संध्याकाळी ६.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईल.