Skip to content Skip to sidebar Skip to footer

2 वर्षांच्या डेटिंगनंतर Aditya Roy Kapur आणि Ananya Pandey यांचे ब्रेकअप?

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्या नात्याबद्दल सतत चर्चेत आहेत. दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर एकत्र सुट्टीवर देखील गेले होते. पण आता या जोडीचे मार्ग वेगळे झाल्याचे मानले जात आहे. दोघांचेही ब्रेकअप झाल आहे अशी चर्चा रंगली आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. इतकंच नाही तर या जोडीला एकत्र पाहीले गेले आहे. पण यादरम्यानच आत एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे ब्रेकअप झाले आहे. 1 महिन्यापूर्वी दोघांचे नाते संपुष्टात आले होते अशी माहीती ही समोर आली आहे.( Ananya and Aditya Breakup)

Ananya and Aditya Breakup
Ananya and Aditya Breakup

रिपोर्टनुसार, दोघांच्या एका कॉमन फ्रेंडने अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर महिन्याभरापूर्वीच विभक्त झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बॉम्बे टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दोन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट करत असलेल्या अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर सुमारे महिनाभरापूर्वी विभक्त झाले असून त्यांच्या ‘ब्रेकअप’मुळे त्यांच्या जवळच्या मित्रांना ही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Ananya and Aditya Breakup
Ananya and Aditya Breakup

रिपोर्टनुसार, अनन्या आणि आदित्यच्या एका कॉमन फ्रेंडने हे ही सांगितले की, दोघांचे नाते खूप चांगले चालले होते. पण जवळपास 1 महिन्यापूर्वी या दोघांचे ब्रेकअप झाले असून या ब्रेकअपने आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो आहोत. दोघेही एकमेकांसाठी खूप चांगले आहेत. पण आता ब्रेकअपनंतर अनन्या दुखावली आहे आणि सगळ विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचबरोबर आदित्यही या परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहे. असे ही त्या मित्राने सांगितले आहे.(Ananya and Aditya Breakup)

====================================

हे देखील वाचा: Ajinkya Deo In Ramayana Movie: Ranbir Kapoor स्टारर ‘रामायण’मध्ये अजिंक्य देव साकारणार महत्त्वाची भूमिका

====================================

गेल्या महिन्यात अनन्या पांडेने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. तेव्हापासून अनन्या आणि आदित्यचं नातं संपुष्टात आल्याची चर्चा होती. त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, जर ते खरंच तुमचं असेल तर ते परत येईल. अनन्या आणि आदित्यच्या नात्याचा खुलासा करण जोहरच्या शो कॉफी विथ करणच्या सेटवर झाला होता. जिथे अभिनेत्रीने तिच्या नात्याबद्दल संकेत दिले होते.