Skip to content Skip to sidebar Skip to footer

एका दिवसासाठी दोन करोड मानधन!

अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान यांचा अतरंगी रे.. हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर येतोय. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. खिलाडीकुमार अक्षय यात एका जादूगाराच्या भूमिकेत आहे. एका वर्षाला कमीतकमी चार चित्रपट करणाऱ्या अक्षयनं अतरंगी रे साठी काटेकोर वेळापत्रक तयार केलं होतं. या भूमिकेसाठी अक्षयनं तब्बल 27 करोड रुपये घेतले आहेत. शुटींगचे शेड्यूल पहाता अक्षयनं एका दिवसासाठी दोन करोड रुपये घेतले आहेत. त्यामुळेच अतरंगी रे सध्या चर्चेत आहे. 

अतरंगी रे (Atrangi Re) चित्रपट जाहीर झाल्यापासून चर्चेत राहीला. दाक्षिणात्य स्टार धनुष हे त्याचं एक कारण होतं. धनुषनं 2013 मध्ये आनंद एल राय यांच्याबरोबर रांझना चित्रपट केला आहे. बॉक्सऑफीसवर हा चित्रपट फारसा चालला नाही. त्यांनंतर ही जोडी आता अतरंगी रे च्या निमित्ताने एकत्र असणार आहे. तसेच सारा अली खानही चर्चेत राहीली. सारा या चित्रपटात दुहेरी भूमिका करणार आहे. वॅलेंटाईन डे ला अतरंगी रे प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबलं. आता काही दिवसांपूर्वी अतरंगी रे चं चित्रिकरण पूर्ण झालं. यावेळी सर्व युनिटबद्दल सारानं आभाराचं छोटंसं पत्रच लिहीलं आणि ते सोशल मिडीयावर शेअर केलं. यात तिनं आनंद एल राय, धनुष, अक्षय कुमार आणि सर्व युनिटचे आभार व्यक्त केले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून भारतातील सर्वात उत्तम लोकेशन बघता आली, तसेच निसर्गाच्या सहवासात वेळ घालवता आला. शिवाय सर्व प्रांतातील खाद्यसंस्कृतीची ओळख झाल्याचे तिनं नमुद केलंय. अतरंगी रेच्या जादूसाठी आता सर्व तयार असल्याचंही तिनं लिहिलंय.

Sara Ali Khan, Akshay Kumar and Dhanush come together for Atrangi Re

साराच्या या पोस्टमुळं अतरंगी रे च्या लोकेशनबाबत उत्सुकता आहे. मध्यंतरी अक्षयनंही त्याचे काही फोटो शेअर केले होते. त्यात अक्षय ताजमहलमध्ये दिसला आहे. यासोबत तामिळनाडू, चेन्नई, मेहताब बाग, आग्रा किल्ला, सिकंदराबाद, फतेहपूर सीकरी, सेंट जॉन्स कॉलेज, स्ट्रैची ब्रिज,आग्रा, मुंबई, आणि चंबळ खोऱ्यातही अतरंगी रे चे शूट झाले आहे. अतरंगी रे साठी ए. आर. रहमान यांनी संगीत दिलं आहे. धनुषने यात गाणंही गायलं आहे. कोलावेरी डी या सुपरहिट गाण्यानंतर तब्बल आठ वर्षानंतर धनुषनं चित्रपटासाठी गाणं गायलं आहे. या लवस्टोरीसाठी हिमांशु शर्मा यांनी लिहिलेली गाणी अतिशय श्रवणीय झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता ही लव्ह स्टोरी 6 ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे. त्याचवेळी सारा, अक्षय, धनुष यांच्या अभिनयाची जादू आणि ए आर रहमान यांच्या संगिताची जादू अनुभवता येणार आहे.