Skip to content Skip to sidebar Skip to footer

All Is Well Marathi Movie Trailer:  तीन मित्रांची धमाल गोष्ट सांगणारा ‘ऑल इज वेल’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित !

All Is Wel Movie“तीन तिघाडा, काम बिघाडा” ही जुनी म्हण खोडून काढणारी, तीन मित्रांच्या धमाल मैत्रीवर आधारित ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटाची धमाकेदार एण्ट्री २७ जूनला होणार आहे . नुकत्याच एका विशेष समारंभात या चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या जल्लोषात आणि कलाकारांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तीन मित्रांची भन्नाट केमिस्ट्री, त्यांचे गंमतीदार किस्से आणि मजेशीर प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. त्यात इतर कलाकारांनी साकारलेली पात्रंही हसवण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. चित्रपटातील कलाकारांनी यावेळी खास आवाहन करत सांगितलं की, “हा चित्रपट प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणारा आहे” (All Is Well Marathi Movie Trailer)

All Is Well Marathi Movie Trailer

निर्माते अमोद मुचंडीकर आणि वाणी हालप्पनवर, तसेच सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे आणि विनायक पट्टणशेट्टी यांनी यावेळी सांगितले की, “नेहमीपेक्षा काहीतरी हटके आणि मजेशीर तयार करण्याची इच्छा होती. लेखक प्रियदर्शन जाधव, दिग्दर्शक योगेश जाधव आणि कार्यकारी निर्माते संजय ठुबे यांच्या कल्पक सहकार्यामुळे ‘ऑल इज वेल’ साकारता आला.” तसेच हा एक कुटुंबासोबत पाहता येईल असा हसवणूक करणारा चित्रपट असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

================================

हे देखील वाचा: Mauli Maharashtrachi कार्यक्रमातून आदेश बांदेकर घेऊन येणार पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी !

================================

दिग्दर्शक योगेश जाधव यांनी सांगितलं की, “इतक्या अनुभवी कलाकारांसोबत एक वेगळा विषय हाताळण्याची संधी मिळणं हे खूपच आनंददायी आहे. प्रेक्षकांना नक्कीच हा सिनेमा आवडेल याची खात्री वाटते.” ‘ऑल इज वेल’ या चित्रपटाचं एक मजेशीर पोस्टर याआधीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं आणि त्याने उत्सुकता निर्माण केली होती. त्यात आता ट्रेलरची धमाल भर पडल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.

All Is Well Marathi Movie Trailer

चित्रपटात प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी आणि दिशा काटकर या कलाकारांनी त्यांच्या भूमिकांना न्याय दिला आहे. त्यांची ऊर्जायुक्त कामगिरी ही चित्रपटाचं खास आकर्षण ठरणार आहे. चित्रपटाचे लेखन प्रियदर्शन जाधव यांनी तर दिग्दर्शन योगेश जाधव यांनी केलं आहे. निर्मितीची जबाबदारी अमोद मुचंडीकर आणि वाणी हालप्पनवर यांच्यावर असून, मल्लेश मरुचे आणि विनायक पट्टणशेट्टी यांनी सहनिर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. संजय ठुबे हे कार्यकारी निर्माते आहेत. (All Is Well Marathi Movie Trailer)

================================

हे देखील वाचा: Amitabh Bachchan यांच्या कोटींच्या संपत्तीचा कोण होणार वारसदार? बिग बीने दिलं स्पष्ट उत्तर म्हणाले… 

================================

चित्रपटात संगीत दिग्दर्शन चिनार-महेश आणि अर्जुन जन्या यांचं आहे. रोहित राऊत आणि अपेक्षा दांडेकर यांच्या आवाजातील गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करतील. छायाचित्रण मयुरेश जोशी, संकलन अथश्री ठुबे, नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे, साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया, वेशभूषा किर्ती जंगम, रंगभूषा अतुल शिधये आणि कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे योगदान चित्रपटाला अधिक प्रभावी बनवतात. २७ जूनपासून चित्रपटगृहात “ऑल इज वेल” प्रेक्षकांची धमाल, मस्ती आणि भरपूर हसवणुक करणार यात शंका नाही.