Skip to content Skip to sidebar Skip to footer

कलाकारांचा शेफ मोड ऑन

लॉकडाऊन मुळे सगळेच घरात आहेत तर या संधीचा फायदा अनेकांनी आपल्या आवडी निवडी जपण्यासाठी केला आहे , रोज टीव्ही वर येऊन आपलं मनोरंजन करणारे कलाकार तर चक्क स्वयंपाक बनवताना बघायला मिळतात. रोजच्या जीवनात शूट आणि बाकी गोष्टी मुळे अनेक कलाकारांना आपल्या स्वयंपाकांची आवड जपायला जमत नाही पण आता हेच कलाकार अनेक नवे पदार्थ करण्यात मग्न झालेत. आपले लाडके कलाकार त्यांच्या किचन मध्ये नेमकं काय नवीन खायला करतात हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ….

     ओक कुटूंबात रोज नवीन पदार्थ बनतात , मंजिरी ओक आणि प्रसाद ओक हे दोघे त्यांच्या किचन मध्ये असे स्वादिष्ट पदार्थ करायला लागले आहेत. मंजिरी ओक या रोज काही न काही नवीन पदार्थांचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया वर शेयर करतात. कढी भात , लिट्टी चोखा , राजमा चावल , फालुदा अश्या अनेक पदार्थांची मेजवानी त्या रोज करतात. मंजिरी ओक नेहमी त्यांच्या सोशल मीडिया वरून त्यांच्या कूकिंग चे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करता आहेत.

https://www.instagram.com/p/B-ofJERJQHQ/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री प्रार्थना बेहेर हिने तिची आवडती गुजराती ” डाळ ढोकळी ” केली होती. तिने चक्क तिच्या किचन मधून हा खास डाळ ढोकळी चा मस्त व्हिडिओ शेयर केला आहे. ती सध्या मस्त गुजरात मध्ये अनेक डिश शिकते आणि त्या करून बघते आहे. प्रार्थना ही तर तिच्या आवडीच्या गोष्टी शिकून त्या प्रेक्षकांना दाखवते आहे.

https://www.instagram.com/p/B-l4AP7Fsz8/?utm_source=ig_web_copy_link

तर अमृता खानविलकर ने तिच्या आई सोबत रेड पास्ता तयार केला आहे. तिने तिच्या किचन मधून हा खास व्हिडिओ शेयर केला आहे. तिने चक्क रेड पास्ता आणि आई सोबतच्या गप्पा या व्हिडिओ मधून आपल्या प्रेक्षकांशी मारल्या आहेत. कलाकारांचा हा खास शेफ मोड आपल्याला त्यांच्या सोशल मीडियावर आपल्याला बघायला मिळतो आहे.

https://www.instagram.com/tv/B-bMcyJp1c8/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेता भूषण प्रधान घरी बसून नव्या गोष्टी शिकतो आहे , त्याने त्याच्या रुटीन सोबत तो स्वयंपाक घरात काही तरी शिकतो आणि घरच्या साठी डोसे तयार करतो आहे. त्याने त्यांच्या फॅन्स ना डोसे कसे बनवायचे हे शिकवलंय आणि हा मस्त व्हिडिओ त्याने त्याचा सोशल मीडिया वरून शेयर केला आहे.

https://www.instagram.com/tv/B-HpXZuFtLX/?utm_source=ig_web_copy_link

बिग बॉस फेम वीणा जगताप कूकिंग चे धडे घेते आहे , तिने तिच्या स्वयंपाक घरात मस्त गोड धोड शिरा बनवला होता. कलाकार हे नेहमीच त्यांच्या शूट मध्ये व्यस्त असतात तर या लॉक डाऊन मुळे ते मस्त स्वयंपाक करतात नवीन पदार्थ बनवतात आणि नव्या गोष्टी देखील शिकतात