चित्रपटाचं काम बंद पडण्याचे किंवा शूटिंग सुरु होण्यापूर्वीच प्रोजेक्ट रद्द होण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा झालेले आहेत. पण ‘बॅटगर्ल’ची गोष्ट वेगळी आहे. मार्व्हल आणि डीसी यांच्यातली स्पर्धा सगळ्यांना माहिती आहे. एकीकडे मार्व्हलने पाचव्या आणि सहाव्या टप्प्यात म्हणजे २०२५ पर्यंत आपल्या चित्रपटांची यादीच मोठा गाजावाजा करून जाहीर केली, अशावेळी ‘बॅटगर्ल’ चित्रपट रद्द होणं हे डीसी भक्तांसाठी खूपच…
इराणमधलं वास्तव, तेथील समाजाची स्थिती, सरकारकडून सहन करावा लागणार अन्याय, तेथील विषमता, गरिबी असे विषय अतिशय प्रभावीपणे मांडणं, ही जाफर पनाही यांच्या फिल्ममेकिंगची खासियत आहे. आता अशा विषयांवर चित्रपट बनवल्यावर इराणमधलं सरकार त्यांच्यावर नाराज असणारच. म्हणूनच संधी मिळताच सरकारने सहा वर्षांसाठी पनाही यांना तुरुंगात डांबलेलं आहे.
वर्षभरात किती परदेशी चित्रपट प्रदर्शित होतील, याबद्दल चीनमध्ये सरकारी धोरण ठरलेलं आहे, ज्यात परिस्थितीनुसार बदल करण्यात येतात. २०१८ पर्यंत वर्षभरात ३० ते ४० हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होऊ शकत होते. पण कोविड काळात धोरण बदललं आणि ही संख्या २० वर आली.
पर्यटन आणि चित्रपट उद्योग यांच्या वाढीसाठी प्रोत्साहन देत असतानाच स्थानिक जनतेच्या मनाला उभारी देण्याचा प्रयत्नही सरकारकडून होतोय. कोरोना काळात भोगलेल्या असंख्य हालअपेष्टातून पोळलेल्या स्थानिक जनतेत नवा उत्साह यावा यासाठी थायलंड सरकारने महिनाभर चालणाऱ्या ओपन एअर फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन केलंय.
‘बीटल्स’ विभक्त झाल्यावर जगभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. ते नेमके का वेगळे झाले याच्या सुरस कहाण्या प्रसिद्ध व्हायला लागल्या. खरं कारण काय होतं हे कधीच कुणी छातीठोकपणे सांगू शकलं नाही.
जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या जेम्स बॉन्ड चाहत्यांना बरीच उत्सुकता असली आणि त्याबद्दल सोशल मीडियापासून सर्वत्र बरीच चर्चा सुरु असली तरी प्रत्यक्ष स्पर्धेत असलेले कलाकार काहीही बोलत नाहीयेत. टॉम हार्डीने याचं कारणही सांगितलं आहे.
चित्रपटात बंदुका, रायफल्स आणि एकूणच हिंसाचाराचं चित्रण अधिक जबाबदारीने करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असं हॉलिवूडमधील जाणत्यांनी जाहीर केलंय. ‘ब्रॅडी कॅम्पेन टू प्रिव्हेंट गन व्हायलन्स (The Brady Campaign to Prevent Gun Violence)’ या संस्थेने पुढाकार घेऊन एक पत्रक काढलंय, ज्यावर हॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या २०० हून अधिक व्यक्तींनी स्वाक्षरी केली आहे.
स्वतःच्या आयुष्यावरील चित्रपट स्वतःच दिग्दर्शित करणं, हे कदाचित पहिल्यांदाच होत असावं. काहीसा आत्मचरित्रासारखाच हा प्रकार. जगप्रसिद्ध पॉपस्टार आणि अभिनेत्री मॅडोनाने हे आव्हान पेलायचं ठरवलं आणि २ वर्षांपूर्वी तशी घोषणाही झाली. डियाब्लो कोडी (Diablo Cody) या सहलेखकासोबत या बायोपिकचं लेखनही मॅडोनाच करणार, हेसुद्धा जाहीर झालं. पण मॅडोनाची भूमिका कोण साकारणार याचा शोध संपतच नव्हता.
“आम्ही लाखो ज्यूंना मारलं असं तुम्ही म्हणत असाल, तर मी अगदी समाधानाने म्हणेन की, आम्ही शत्रूचा खात्मा केला हे उत्तमच झालं. मी जे कृत्य केलं त्याबद्दल मला कसलाही पश्चाताप नाही.” – अडॉल्फ आईकमन (Adolf Eichmann)
कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी जपानमधील १३ बड्या चित्रपट निर्मात्यांनी तीन व्यक्तींविरोधात खटला दाखल केला आहे. या १३ निर्मात्यांनी ३ आरोपींकडून ३.९ मिलियन डॉलर्स म्हणजेच ३० कोटी २८ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी आहे युट्युबवर अपलोड होणारे आणि तरुणाईत वेगाने लोकप्रिय होत असलेले ‘फास्ट मूव्हीज’