Skip to content Skip to sidebar Skip to footer

बॅबिलॉन: हॉलिवूडचा प्रवास उलगडून सांगणारा महासिनेमा! कोण साकारणार चार्ली चॅप्लिनची भूमिका?

हॉलिवूडमध्ये १९२० नंतर मूकपटांची जागा बोलपटांनी घ्यायला सुरुवात केली. बोलपट आल्यामुळे केवळ मनोरंजन विश्वात नाही, तर एकूणच पाश्चिमात्य जगण्यात सांस्कृतिक क्रांती घडून आली. मूकपटांमध्ये अनेक वर्षं टिकून राहिलेल्या आणि सुपरस्टारपदी पोचलेल्या अनेक अभिनेत्यांना बोलपटांशी जुळवून घेणं कठीण जात होतं.

Read more

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम: रशियात आता थेट थिएटरमध्येच ‘पायरसी’

रशियातील चित्रपटगृह मालकांच्या संघटनेनं एक पत्रक जारी केलं. त्यात त्यांनी म्हटलं, “महत्त्वाच्या देशांनी त्यांच्या चित्रपटांचं रशियातील प्रदर्शन रोखल्यामुळे आम्हाला खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. रशियन चित्रपटांचा दर्जा आणि संख्या ही स्थानिक प्रेक्षकांची मनोरंजनाची भूक भागवू शकत नाही. त्यातच काही रशियन चित्रपटांनी प्रदर्शन पुढे ढकललं आहे. या परिस्थितीत आमचं ८० टक्के उत्पन्न घटणार आहे.…

Read more

‘एलन डिजनरेस’चा जगप्रसिद्ध टॉक शो घेणार निरोप

‘अ व्हेरी गुड प्रॉडक्शन’ असं नाव असूनही कंपनीत काम करणं कठीण होत चाललंय, अशा तक्रारी वाढायला लागल्या. अगदी ‘मी टू’ चे आरोपही झाले. या तक्रारी थेट एलन बद्दल नसल्या तरी तिचं नाव मीडियामध्ये ओढलं जात होतं.

Read more

‘नाईकी’ आणि मायकल जॉर्डन यांच्यामधील करारावर आता येतोय हॉलिवूडपट! 

१९८४ साली ‘नाईकी’ने मायकल जॉर्डनला २५ लाख अमेरिकन डॉलर्स एवढी घसघशीत रक्कम देऊन करारबद्ध केलं होतं. आजच्या बाजारभावाशी तुलना केली, तर हीच किंमत १३० कोटी अमेरिकन डॉलर्स एवढी होईल. 

Read more

नेटफ्लिक्स: आमची सगळीकडे शाखा आहे!

नेटफ्लिक्स लाँच होऊन आता २४ वर्षं झाली आहेत. नेटफ्लिक्सची कमाई ही पूर्णपणे सबस्क्रायबर्स वर अवलंबून आहे, नेटफ्लिक्सवर कोणत्याही जाहिराती नसतात आणि त्यामुळेच नेटफ्लिक्स भारतासारख्या देशात किती काळ तग धरू शकेल? नेटफ्लिक्स तोट्यात सुरु आहे का? अशा अनेक चर्चा आपल्याकडे सुरु असतात. पण खरी परिस्थिती वेगळीच आहे.

Read more

सौदीमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली, हॉलिवूडसाठी मात्र पायघड्या 

सौदीमध्ये राजेशाहीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आंदोलकांना जेरबंद करण्यात आलं, तुरुंगात त्यांचा छळ करण्यात आला. अनेकांना मृत्युदंड देण्यात आला. अशा पाशवी वृत्तीच्या राज्यकर्त्यांबरोबर हॉलिवूडने सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध प्रस्थापित करावेत, हे या संघटनांना मान्य नाही. म्हणूनच डिसेंबरमध्ये जस्टिन बिबरच्या सौदीमधील कॉन्सर्टला विरोध झाला होता.

Read more

हॉलिवूडच्या चित्रपटांना बसतोय चीनमधील सेन्सॉरशिपचा विळखा 

सरकारी सेन्सॉरशिपबरोबरच सोशल मीडियामधून होणारं ट्रोलिंग आणि त्यातून चित्रपटावर येणारी बंदी हे फक्त आपल्याकडे नाही, तर जगभरात सुरु आहे. याचा ताजा बळी आहे ‘मेट्रीक्स’ फेम ‘कीआनू रिव्ह्ज’.

Read more