खरंतर, ही आठवणीतली मालिका म्हणता येणार नाही कारण ही मालिका नव्हती, तर गाण्याचा रियालिटी शो होता. याला भारतामधला संगीत जगतातील पहिला रियालिटी शो म्हणता येईल. हा कार्यक्रम दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित केला जात असे. कार्यक्रमाचं नाव होतं ‘मेरी आवाज सुनो’.
सिनेमाच्या नावावरून सर्वांना अंदाज आलाच होता की, हा ऐतिहासिक सिनेमा असणार. तसा तो होताही, पण ऐतिहासिक घटनेला काल्पनिक प्रेमकथेची जोड देऊन दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी इतिहासाच्या चित्रातही प्रेमाचे गुलाबी रंग भरले आणि त्याला साथ मिळाली ती सुमधुर गाण्यांची. सिनेमामधली सर्वच गाणी अप्रतिम आहेत आणि आजही ती तितक्याच आवडीने ऐकली जातात.
त्यावेळी काही मालिका साप्ताहिक मालिका होत्या. या मालिकांना सलग कथानक नव्हतं, तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी कथा सादर होत असे. त्यामुळे या आठवड्यात कुठली कथा असेल, त्यामध्ये कोणते कलाकार असतील याची उत्सुकता असायची. अशाच काही मराठी मालिकांविषयी –
कॉलेजला रॅगिंग करणारा, गर्लफ्रेंडच्या कानाखाली आवाज काढणारा, तिच्या घरी जाऊन राडा करणारा, ब्रेकअप नंतर दिवसरात्र दारूच्या नशेत आणि सिगारेटच्या धुरात बुडालेला कबीर सिंग तरुणाईच्या पसंतीस उतरला. मुख्य म्हणजे यामध्ये तो ‘कॉलेज बॉय’ वाटतोय आणि म्हणूनच त्याला प्रेक्षकांनी स्वीकारलं. कबीर सिंगच्या भूमिकेसाठी शाहिदने तब्बल १४ किलो वजन कमी केलं होतं.
हिंदीमध्येही उत्तमोत्तम भयकथा असणाऱ्या वेबसिरीज वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत. आज अशाच काही वेबसिरीजबद्दल माहिती घेऊया ज्या तुम्हाला हॉलिवूडच्या भयपटांची आठवण करून देतील.
‘अधुरी एक कहाणी’ या मालिकेला प्राईम टाइम देण्यात आला नव्हता. मालिका दररोज रात्री ९ वाजता प्रसारित होत असूनही ती लोकप्रिय झाली. मालिकेचं शीर्षक ‘अधुरी एक कहाणी’ म्हणजे एका सुप्रसिद्ध गाण्यामधली एक ओळ आहे. मालिकांना सुप्रसिद्ध गाण्याची ओळ शीर्षक म्हणून वापरण्याची पद्धत बहुदा याच मालिकेपासून सुरु झाली असावी.
ताल हा चित्रपट यूएसए मधील बॉक्स ऑफिस चार्टमध्ये टॉप २० चित्रपटामध्ये समाविष्ट झालेला पहिला हिंदी चित्रपट होता. ‘हम दिल…’ मधली नंदिनी आणि ‘ताल’ मधली मानसी या दोन्ही व्यक्तिरेखांमुळे प्रेक्षक ऐश्वर्याला खऱ्या अर्थाने ‘अभिनेत्री’ म्हणून ओळखायला लागले. त्याआधी त्यांच्यासाठी फक्त ‘मिस वर्ल्ड’ होती.
‘गुंतता हृदय हे’ ही मालिका विवाहबाह्य संबंधांवर आधारित रहस्यमय, कौटुंबिक मालिका होती. अत्यंत वेगळ्या वळणावरची अशी ही मालिका अवघ्या १६० भागांत संपवल्यामुळे मालिका कुठेही कंटाळवाणी झाली नाही. मालिकेचं शीर्षक आणि शीर्षकगीत कथेला अगदी समर्पक होतं. शीर्षकगीत श्रवणीय तर आहेच शिवाय प्रचंड प्रभावी झालं आहे. अवघ्या दीड मिनिटांच्या गाण्यामध्ये मालिकेचा पूर्ण आशय दडलेला आहे
मिस वर्ल्ड ‘मानुषी छिल्लर’ हिने ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. मानुषीच्या आधीही सौंदर्यस्पर्धा जिंकलेल्या तरुणी बॉलिवूडमध्ये आल्या आहेत. त्यामधील काहींची कारकीर्द बहरली, तर काही उरल्या केवळ आठवणीत. अशाच काही अभिनेत्रींबद्दल –
एकाच चित्रपटात चार प्रेमकहाण्या, रोमँटिक गाणी, नयनरम्य लोकेशन्स आणि नवीन कलाकारांसह बॉलिवूडमधले नामवंत कलाकार; असा सगळा लवाजमा घेऊन २००० साली आलेला ‘मोहब्बते’ हा चित्रपट आजही लोकांच्या स्मरणात आहे.