छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आठ चित्रपट (अष्टक) काढायचे ध्येय घेतलेल्या दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा या अष्टकामधला चौथा चित्रपट ‘शेर शिवराज’ हा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पांचा सारांश
‘कहो ना प्यार है’ हा राकेश रोशनने हृतिकला फिल्म इंडस्ट्रीमध्ये लॉन्च करण्यासाठीच बनवला होता. परंतु, या स्क्रिप्टच्या सुरुवातीला राजेश रोशनच्या डोक्यात नायकाच्या भूमिकेसाठी शाहरुख खानचे नाव होते
२५ जानेवारी १९८७ साली रविवारी सकाळी दूरदर्शनवर ‘रामायण’ नावाची मालिका सुरु झाली आणि अल्पावधीतच लोकप्रियही झाली. त्यावेळी या मालिकेच्या प्रक्षेपणाच्या वेळेत रस्ते ओस पडू लागले आणि ज्या घरांत टीव्ही होते ती घरे ‘हाऊसफुल’ होऊ लागली, तर काही जणांच्या घरी नवीन टीव्हीची खरेदीही झाली.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाने शाहरुखला खऱ्या अर्थाने ‘रोमँटिक हिरो’ ही ओळख मिळवून दिली. त्यावेळी त्याला बाजीगर, डर, अंजाम, कभी हा कभी ना अशा चित्रपटातील नकारात्मक आणि एकतर्फी प्रेम करणाऱ्या व्हिलनच्या इमेजमधून बाहेर पडणं आवश्यक होतं आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ मधील राजच्या भूमिकेने त्याला ही संधी दिली.
जॉन गियरसन, या स्कॉटिश शिक्षणतज्ज्ञाने १९२० च्या दशकाच्या मध्यात ‘डॉक्युमेंटेअर’ या फ्रेंच शब्दापासून डॉक्युमेंटरी (Documentary) या शब्दाची निर्मिती केली. डॉक्युमेंटरी म्हणजे थोडक्यात सांगायचं तर माहितीपट. हा प्रकार चित्रपट निर्मितीच्याही आधीपासून लोकप्रिय होता.
काही गोष्टी परफेक्ट असतात, तर काही गोष्टी ‘परफेक्शन’ या शब्दाची व्याख्या बनून जातात. ‘दिल चाहता है’ हा असा चित्रपट आहे ज्या चित्रपटाने परफेक्शनची व्याख्या ठरवून दिली. हा चित्रपट बनण्यापूर्वीच्या गोष्टीही तितक्याच रंजक आहेत. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.
मध्यंतरी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याला एका विदेशी पत्रकाराने इंटरव्ह्यूमध्ये एक प्रश्न विचारला. तो प्रश्न म्हणजे, “तुम्ही एकत्र कुटुंबात राहता मग तुम्ही तुमचं आयुष्य मॅनेज कसं करता?” यावर निरुत्तर झालेल्या ऐश्वर्याने अभिषेककडे बघितलं.
केवळ पद्धतीच नाही, तर कपड्यांची फॅशनही बॉलिवूड आणि मालिकांमधूनच सर्वदूर पसरत चालली आहे. लग्न अथवा रिसेप्शनच्या वेळी घागरा-चोली किंवा वनपीस नाही, तर ‘शालू’ हा महाराष्ट्रीयन परंपरेचा भाग होता. जो काही दिवसांत इतिहासजमा होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर संगीत- मेहंदी नाईट्स या गोष्टीही महाराष्ट्रीयन संस्कृतीचा भाग कधीच नव्हत्या.
हिंदीसोबत इतर प्रादेशिक भाषेत गाणी गाणाऱ्या मन्ना डे यांनी आपल्या मराठी भाषेतही अनेक गाणी गायली आहेत. पण गंमत म्हणजे बंगाली, हिंदी वगळता त्यांना इतर प्रादेशिक भाषा बोलता येत नसत, मराठी तर नाहीच नाही.
हिंदी चित्रपटांबाबत होणारे वाद काही आपल्याला नवीन नाहीत. पण हे लोण हिंदीकडून मराठीमध्येही आलं आहे. आणि नुसतंच आलं नाही, तर एकदम कमी वेळात ते खोलवर रुजतंही चाललं आहे.