एक यशस्वी अभिनेता आणि लेखक असणारा चिन्मय मांडलेकर आता ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटामधून हिंदीमध्ये पदार्पण करत आहे. एकीकडे त्याचा ‘पावनखिंड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होत वेगवेगळे रेकॉर्ड ब्रेक करत असतानाच आज ‘द काश्मीर फाईल्स’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला. या निमित्ताने चिन्मयशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा.
राजकारण, दहशतवाद, हिंसा हा मुख्य मसाला वापरून त्याला बोल्ड सीन्सचा तडका मारून तयार केलेली वेबसिरीज हीच भारतीय वेबसिरिजच्या दुनियेची ओळख बनू पाहतेय आणि हेच जास्त धोकादायक आहे.
अनदेखीच्या सिझन २ चा विचार करता सिरीजचा ‘स्पीड’ ही या सिरीजची सर्वात जमेची बाजू आहे. यामुळे सिरीज कुठेही रटाळ होत नाही. मात्र सिरीजमध्ये अचानक, अनपेक्षित घडणाऱ्या घटना नैसर्गिक न वाटता ओढून ताणून घडवून आणल्यासारख्या वाटतात आणि त्या अजिबातच क्लिक होत नाहीत.
अभिषेक बच्चन, सैफ अली खान, माधुरी दीक्षित यांच्यामागोमाग आता अजय देवगणनेही ओटीटीच्या दुनियेत प्रवेश केला आहे. ‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस (Rudra: The Edge of Darkness) या वेबसिरीजद्वारे त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिमाखात एंट्री घेतली आहे.
या वेबसिरीजमध्ये माधुरी ‘अनामिका आनंद’ हे पात्र साकारले आहे. खूप मोठ्या काळानंतर माधुरी एका सशक्त भूमिकेत दिसली आहे. ही एक सस्पेन्स थ्रिलर वेबसिरीज असून एकूण ४० ते ५० मिनिटांच्या सहा भागांमध्ये विभागली आहे. शेवटच्या भागाच्या शेवटी दुसरा भाग येणार याची हिंट द्यायलाही दिग्दर्शक विसरले नाहीयेत.
“एक चतुर नार…” हे गाणं गाण्यासाठी सुरुवातीला मन्ना डे तयार नव्हते. त्यासाठी त्यांची खूप मिनतवारी करावी लागली. अर्थात कोणताही गायक मास्टरजींसाठी गाणं गायला सहजी तयार झाला नसताच. याचं मुख्य कारण म्हणजे या गाण्यामध्ये मास्टरजी विद्यापथींकडून हरताना दाखविण्यात आलं आहे.
मराठीमधील पहिली दैनंदिन मालिका म्हणजे दामिनी! ही मालिका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर संध्याकाळच्या वेळी प्रसारित होत असे. दामिनीच्या भूमिकेने प्रतीक्षा लोणकरला सक्षम अभिनेत्री म्हणून ओळख तर मिळवून दिलीच, शिवाय यामुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतीदिन. भारतामधील पहिला चित्रपट (मूकपट) बनविण्याचे श्रेय दादासाहेबांना देण्यात आले असले तरी यावर आक्षेपही नोंदविण्यात आला होता.
१९९५ साली अलिशा चीनॉयच्या ‘मेड इन इंडिया’ या अल्बमपासून भारतीय संगीत जगतात खऱ्या अर्थाने पॉप संगीताचे (indipop) आगमन झाले. याच अल्बममुळे मॉडेलिंग जगतात ‘मिलिंद सोमण’ नावाच्या मराठी ताऱ्याचा उदय झाला. गाण्याइतकीच किंबहुना थोडी जास्तच लोकप्रियता मिलिंद सोमणलाही मिळाली आणि तो ‘ड्रीम बॉय’ म्हणून सौंदर्यवतींच्या मनावर राज्य करू लागला.
२९ जानेवारी १९७५ रोजी म्हणजेच तब्बल ४६ वर्षांपूर्वी इंडियन नॅशनल थिएटर निर्मित आणि पु. ल. देशपांडे लिखित व दिग्दर्शित ‘ती फुलराणी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला होता. मुळात हे नाटक म्हणजे ती ‘जॉर्ज बर्नार्ड शॉ’ यांच्या ‘पिग्मॅलियन’ या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे.