Skip to content Skip to sidebar Skip to footer

हरे रामा हरे कृष्णा: चित्रपटाचं शूटिंग बघणारा मुलगा नेपाळचा राजकुमार आहे हे समजलं तेव्हा… 

नेपाळच्या डोंगराळ प्रदेशात लोकेशन निश्चित केल्यानंतर देव आनंद हॉटेलवर परतला तेव्हा त्याला समजले की, तो तिथेच स्क्रिप्ट विसरला आहे. त्याने त्वरित रिसेप्शनला फोन करून पायलटला परत लोकेशनवर पाठवण्यासाठी विनंती केली, पण तोपर्यंत पायलट निघून गेला होता. यानंतर देव आनंदला राजा ज्ञानेंद्र यांचे वडील राजा महेंद्र यांच्याकडे एअरक्राफ्ट असल्याचे कळल्यावर त्यानं विनंती केली व घटनास्थळी गेला.…

Read more

Ekda Kaay Zala Movie Review: बाप-लेकाच्या नात्याचा नितांतसुंदर, हळवा प्रवास

एकदा काय झालं…हा चित्रपट तुम्हाला जेवढं हसवतो तेवढंच रडवतोही. नकळतपणे पालकत्व कसं असावं हे ही शिकवतो. इथे भावना आहेत, पण ‘मेलोड्रामा’ नाही. इथे कोणी नायक नाही, नायिका नाही, इतकंच काय तर व्हिलनही नाही. आहे फक्त एक प्रवास गोष्टींचा, ध्येयाचा आणि नात्यांचा..

Read more

देवयानी: “तुमच्यासाठी कायपन….” एक हळवी प्रेमकहाणी

स्टार प्रवाह वाहिनीवर २०१२ साली प्रसारित झालेल्या या मालिकेला तेव्हा प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. संग्राम पाटील आणि शिवानी सुर्वे ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर आली आणि अल्पावधीतच लोकप्रियही झाली. त्यावेळी आलेल्या मालिकांपैकी खास करून मराठी मालिकांपैकी निवडक मालिकांनीच तरुणाईला आकर्षित केलं होतं. देवयानी यापैकीच एक मालिका होती

Read more

हिरॉईन: या चित्रपटाने बॉलिवूडची ‘अंदर कि बात’ सर्वांसमोर आणली…. 

२०१२ साली आलेला हिरॉईन (Heroine) हा चित्रपट करीनाच्या कारकिर्दीतला एक उत्कृष्ट चित्रपट समजला जातो. स्त्रीप्रधान असणारा हा चित्रपट बॉलिवूडची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांसमोर आणतो. चित्रपटाची कथा ‘माही’ नावाच्या व्यक्तिरेखेभोवती फिरते.

Read more

वेबसिरीजला LGBT बोल्ड सीन्सचा तडका खरंच आवश्यक आहे का?

चित्रपटांमधून अनेकदा कथानकाची गरज या कारणास्तव ‘बोल्ड’ दृश्य दाखवली जातात, पण चित्रपटांना सेन्सॉरशिप असल्यामुळे तिथे अनेक मर्यादा येतात. पण वेबसिरीजला सेन्सॉरशिपचा प्रश्नच येत नसल्यामुळे त्यामध्ये काहीही दाखवावं, असा जणू एक प्रघातच पडला आहे. त्यामुळे कथानकाची गरज असो किंवा नसो, आजकाल बहुतांश वेबसिरीजमध्ये ‘अशाप्रकारचे’ बोल्ड सिन आवर्जून दाखवले जातात

Read more

सुरभी भावे – लहान वयातच एकामागून एक संकटे आली, पण मी हार मानली नाही…

शाळेत अनेकदा प्रमुख पाहुणे म्हणून मोठमोठे अधिकारी व मंत्री येत असत. त्यामुळे त्यावेळी सुरभीने एमपीएससी किंवा यूपीएससी करून सरकारी अधिकारी व्हायचं स्वप्न बघितलं होतं. अशातच तिला मायग्रेनचा अटॅक आला आणि ती गुहागरला परत गेली.

Read more

कदाचित: भूतकाळात घडलेल्या घटनेचं गूढ उकलणारा एक हळवा प्रवास

२००७ साली आलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून अश्विनी भावे यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं. एका वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट निर्मितीचं धाडस त्यांनी दाखवलं आणि त्या यामध्ये यशस्वीही झाल्या. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते चंद्रकांत कुलकर्णी. चित्रपटात रहस्याचा भाग असला तरी, हा रहस्यपट नाहीये. तरीही चित्रपटाची कथा शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

Read more

एक हळवी प्रेमकहाणी: महाराष्ट्राची महामालिका ‘कुलवधू (Kulvaddhu)’

मालिकेचे प्रोमोज जेव्हापासून झळकायला लागले होते तेव्हापासूनच प्रेक्षकांच्या मनात या मालिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. झी मराठीने प्रमोशनवर बरीच मेहनत घेतली होती. त्यावेळी ‘महाराष्ट्राची महामालिका’ अशी या मालिकेची जाहिरात करण्यात आली होती.

Read more

दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांचा बोलबाला…. बॉलीवूडला मात्र ठेंगा 

महाराष्ट्रात परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. मराठी चित्रपट चांगला प्रेक्षकवर्ग खेचतायत. वर्षाच्या सुरुवातीलाच झिम्मा, पावनखिंड सारख्या चित्रपटांनी बाजी मारली. एकीकडे झुंड, धाकड, पृथ्वीराज चित्रपटांचे खेळ रद्द होत होते, तर त्याचवेळी केजीएफ, आर आर आर, शेर शिवराज, सर सेनापती हंबीरराव, चंद्रमुखी, धर्मवीर सारखे चित्रपट व्यवस्थित सुरु होते.

Read more

आपला मानूस: आत्महत्या, हत्या की खून? या प्रश्नाभोवती फिरणारा रहस्यमय चित्रपट 

२०१८ साली आलेल्या ‘आपला मानूस’ या चित्रपटात घरात एकटी राहणारी वृद्ध माणसं आणि त्यांच्या समस्यांवर रहस्यमय पद्धतीने प्रकाश टाकण्यात आला आहे. आबा गोखले हे राहत्या घराच्या बाल्कनीमधून खाली पडतात. आता हा अपघात असतो, आत्महत्या असते, की खून, या प्रश्नाभोवती चित्रपटाचं कथानक फिरत राहतं.

Read more