२००७ साली आलेली ‘असंभव’ ही मालिका गूढ, रहस्यमय प्रकारातली मालिका होती. ही मालिका दररोज रात्री ८.३० वाजता प्रसारित केली जात असे. अशा विषयांवर आधारित मालिकेला ‘प्राईम टाइम’ द्यायचा चॅनेलचा निर्णय मालिकेने सार्थ ठरवला. मालिकेने अगदी पहिल्या भागापासूनच रसिकांच्या मनावर घेतलेली पकड अगदी शेवटपर्यंत कायम ठेवली होती.
कोकणी माणसाच्या जगण्याची पद्धतही एकदम साधी आणि सोपी. आपल्या बागांवर इथल्या माणसाचं जीवापाड प्रेम असतं. अशाच एका निवांत जगणाऱ्या आणि घामाचं पाणी करून फुलवलेल्या बागेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या नारबाच्या जगण्याची खरंतर मरणाची कहाणी म्हणजे ‘नारबाची वाडी’.
राजकारण आणि मीडिया हे असे विषय आहेत ज्याबद्दल सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण वाटतं आणि त्यावर नेहमीच उलटसुलट चर्चा होत असते. या दोन्ही विषयांवर आधारित २००१ साली एक चित्रपट आला होता ज्याचं नाव होतं ‘नायक- द रियल हिरो’
‘शाळा’ या चित्रपटामध्ये साधारणतः सत्तरच्या दशकातील काळ दाखवण्यात आला आहे. स्मार्टफोन, मोबाईल इ. च्या आगमनाचा इतकंच काय तर, लँडलाईनही क्वचितच कोणाकडे असण्याचा तो काळ. गावातलं शांत, रम्य वातावरण, गावातली शाळा, या शाळेत जाणारी गावातली वेगवेगळी कौटुंबिक पार्श्वभूमी असणारी मुलं, त्यांची मैत्री, शाळेतल्या गमती जमती यांचं अगदी ‘परफेक्ट’ चित्रण करण्यात आलं आहे.
‘जस्सी जैसी कोई नही’ ही कथा आहे जस्मित वालिया उर्फ ‘जस्सी’ नावाच्या सर्वसामान्य पंजाबी कुटुंबातल्या एका कुरूप पण अत्यंत हुशार मुलीची. ती उच्चशिक्षितही असते. पण तिच्या कुरूप रुपामुळे तिच्यामध्ये अजिबात आत्मविश्वास नसतो. यामुळेच हुशार आणि उच्चशिक्षित असूनही तिला चांगली नोकरी मिळत नसते. अखेर तिला एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळते पण पर्सनल सेक्रेटरीची! अरमान सूरी नावाच्या…
नुकताच प्रदर्शित झालेला ‘कालजयी सावरकर’ हा लघुपट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावर आधारित आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आयुष्य अवघ्या एका तासात मांडताना त्यांच्या बालपणापासूनचे अनेक महत्त्वाचे प्रसंग यामध्ये मांडण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जे प्रसंग सर्वसामान्यांना माहिती नाहीत असे प्रसंग व त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
BARC (2020) च्या अहवालानुसार स्टार प्रवाह ही वाहिनी महाराष्ट्र व गोवा राज्यांमध्ये आघाडीची वाहिनी आहे. या वाहिनीने २०२१ मध्येही आपला दबदबा कायम ठेवला होता. त्यावर्षी ही वाहिनी सर्वाधिक म्हणजे ४४.४ अब्ज मिनिटे पाहिली गेली. आता २०२२ मध्येही स्टार मराठीची लोकप्रियता कायम आहे.
तीन तास डोक्याला कोणताही ‘शॉट’ न देता मस्त करमणूक करणाऱ्या आणि पोटभरून हसायला लावणाऱ्या या चित्रपटात शैक्षणिक पद्धतीवर टीकाही करण्यात आली आहे. देशात दरवर्षी हजारो ‘परीक्षार्थी’ पदवीधर होतात. शैक्षणिक संस्था फक्त परीक्षार्थी घडवतात विद्यार्थी नाही. हा महत्त्वाचा मुद्दा या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
अविनाश आणि रावीच्या मनातील द्वंद्वाचं रूपक म्हणजे पाऊस. जेव्हा दोघं समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्या मनातल्या भावना प्रखरपणे व्यक्त होतात. एकमेकांचे गैरसमज दूर करताना या भावना कधी मुसळधार पावसाप्रमाणे बरसतात, तर कधी वास्तव समोर आल्यावर डोळ्यात थिजून राहतात, मूकपणे ओघळत राहतात. भावभावनांचे चढ-उतार पावसाच्या सरींसारखे बरसत राहतात.
‘हम पाँच’ ही मालिका बालाजी टेलिफिल्म्सची पहिली निर्मिती होती. या मालिकेच्या माध्यमातून एकता कपूरने वयाच्या १६ व्या वर्षी निर्माती म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी तिचं ऑफिस गॅरेजमध्ये होतं.