दिव्या भारतीने १९९१ साली ‘विश्वात्मा’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण तिला खरी ओळख मिळाली ती १९९२ सालच्या ‘दिवाना’ या चित्रपटामुळे. ‘दिवाना’मधली तिची ‘काजल’ ही व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली होती. या चित्रपटाने चित्रपटसृष्टीला शाहरुख नावाचा सुपरस्टारही मिळवून दिला.
‘मुंबईचा फौजदार’ या चित्रपटाची कथा नवीन नसली तरी ती अतिशय सुंदर पद्धतीने फुलवण्यात आली आहे. त्यामुळेच हा चित्रपट बघताना कुठेही कंटाळवाणा होत नाही. लग्नानंतर हळुवार फुलत जाणाऱ्या प्रेमाला विनोदाची फोडणी देऊन दिग्दर्शक राजदत्त यांनी एक अप्रतिम, हलका फुलका मनोरंजक चित्रपट बनवला आहे.
‘वादळवाट’ मालिका सुरु झाली तेव्हा पत्रकारिता या विषयावर आधारित तशा बऱ्याच मालिका येऊन गेल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायला हवा तो रिपोर्टर, शांती, दामिनी, इ. मालिकांचा. पण या सगळ्या मालिका पत्रकाराचं आयुष्य, त्याची आव्हाने अशा वैयक्तिक गोष्टी मांडणाऱ्या होत्या. वादळवाट इथे वेगळी ठरली.
कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका सामान्य सुसंस्कारी कुटुंबातली मुलं चुकीच्या संगतीमुळे आणि झटपट श्रीमंत व्हायच्या लालसेमुळे अत्यंत ‘भयंकर’ पद्धतीने झालेल्या गुन्ह्यांचा एक भाग बनतात. एकामागून एक खून करतात. या खुनांची श्रुंखला सुरु होते ती या मुलांनी केलेल्या स्वतःच्याच मित्राच्या खुनापासून.
लगानबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. तसंच लगान बद्दल माहिती नाही, असं म्हणणारंही क्वचितच कोणी असेल. त्यामुळे आता जे फारसं कोणाला ‘माहिती नाही’ त्याबद्दल लिहिणं आवश्यक आहे. या माहिती नसणाऱ्या गोष्टी म्हणजे ‘लगान’च्या मेकिंग दरम्यान घडलेले किस्से. त्याबद्दलच थोडंसं –
राजकारण तर राजकारण्यांचं असतं, पण यात भरडला जातो तो सामान्य नागरिक. पण इथे तर एक साधी, सरळ, अनाथ मुलगी मोहरा बनते एका वजिराची. बलात्काराच्या जखमांनी शरीर आणि मन उद्धवस्थ झाल्यावर डोळ्यात आसवांशिवाय काहीच उरत नाही. अशावेळी गरज असते ती एका साथीदाराची. डोळ्यातली आसवं अलवारपणे पुसणाऱ्या आश्वासक स्पर्शाची. पण दुर्दैवाने तिच्या नशिबात यातलं काहीच येत नाही.
स्नेहलता दसनूरकर यांच्या एका छोट्या कथेवर आधारित असणाऱ्या अवंतिका या मालिकेला कथाविस्तार करून खुलवलं ते रोहिणी निनावे यांनी. मूळ कथेमध्ये मालिकेतील अनेक पात्रं समाविष्ट नव्हती. फक्त अवंतिका, तिचे आई-वडील, सौरभ, त्याचं कुटुंब आणि मैथिली एवढ्याच पात्रांवर आधारित ही कथा होती. परंतु मालिका बनवताना एवढ्या मर्यादित व्यक्तिरेखांच्या आधारे बनवता येत नाही. त्यामुळे यामध्ये अवंतिकाची बहीण, मित्र…
बॉलिवूडच्या टिपिकल मसालापट चित्रपटांपैकी एक असूनही खलनायक वेगळा ठरला तो सुभाष घई यांच्या दिग्दर्शनामुळे. चित्रपटातील विवादित “चोली के पीछे क्या है…” या गाण्यासाठी त्या वर्षीचे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते – एक सर्वोत्कृष्ट पार्श्वभागायनासाठी इला अरुण आणि अलका याज्ञीक यांना, तर दुसरा सरोज खान यांना सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनासाठी.
तो काळ होता माधुरी दीक्षित, जुही चावला आणि श्रीदेवीचा. या तिन्ही अभिनेत्री नंबर १ च्या स्पर्धेत होत्या. श्रीदेवी या दोघीना तशी सिनिअर. पण माधुरी आणि जुही मात्र एकमेकींच्या कट्टर स्पर्धक होत्या.
दिलीप प्रभावळकर यांनी ‘अनुदिनी’ नावाचं सदर ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलं होतं. पुढे या सदरामधील लेख एकत्रित करून पुस्तकरूपाने ‘अनुदिनी’ याच नावाने प्रसिद्ध करण्यात आलं. या पुस्तकावर आधारित मालिका झी मराठीवर प्रसिद्ध करण्यात आली होती ती मालिका म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे.