अनेक विषयांवर चित्रपट तयार होत असतात. काही चित्रपट सत्यघटनेवर आधारित असतात. मराठीमधील अशाच काही सत्यघटनेवर आधारित चित्रपटांची माहिती घेऊया
सध्याच्या काळात खास करून लॉकडाऊनमुळे मुलांच्या हातात सर्रास स्मार्टफोन आले. ऑनलाईन शाळा/ क्लासेसमुळे मुलांसाठी इंटरनेटचा वापर करणं सोपं झालं आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पालकांनी आपल्या किशोरवयीन मुलांसोबत बसून हा चित्रपट आवर्जून बघायलाच हवा.
‘बाजीगर’मध्ये रोमान्स, सस्पेन्स, ड्रामा, मिस्ट्री सारं काही होतं आणि सोबतीला सुमधुर गाणी. म्हणूनच नायकाची नकारात्मक भूमिका असूनही या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटाची कथा जितकी मसालेदार आहे तितकेच चित्रपटाच्या मेकिंगचे किस्सेही भन्नाट आहेत. त्याबद्दलच थोडंसं –
सुरुवातीच्या काळात झी मराठीवर प्रदर्शित झालेल्या उत्तम मालिकांमध्ये एक नाव आवर्जून घ्यायला हवं ते म्हणजे ‘प्रपंच’ या मालिकेचं. त्या काळात ‘विभक्त कुटुंब’ ही संकल्पना समाजात चांगलीच रुजली होती. एकत्र कुटुंब या संकल्पनेचं भविष्य काय, असा प्रश्न उभा राहिला होता. त्याच काळात एका एकत्र कुटुंबाची कहाणी या मालिकेमध्ये मांडण्यात आली.
मे २००४ ला प्रदर्शित झालेला ‘सातच्या आत घरात’ हा चित्रपट पुण्यामध्ये घडलेल्या सत्यघटनेवर आधारित आहे. (Marathi Movie Satachya Aat Gharat)
चित्रपट निर्मितीसोबत डिस्ट्रिब्युशन, सिंडिकेशन आणि ॲक्विझिशन या संकल्पनाही महत्त्वाच्या असतात. केवळ डिस्ट्रिब्युशन करून भागत नाही. ओव्हरसीज, म्युझिक सेल, ओटीटी किंवा टीव्हीवर कधी पब्लिश करायची हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची आवश्यकता असते.
पुष्पा चित्रपटाची कहाणी आणि प्रदर्शनानंतरचे किस्से, तर रंजक आहेतच. पण या चित्रपटाच्या शूटिंग दरम्याचे किस्सेही तितकेच धमाल आहेत. त्याबद्दलच थोडंसं जाणून घेऊया.
झी मराठी (पूर्वीचं अल्फा टीव्ही) या चॅनेलवर १९९९ साली प्रदर्शित झालेली ही मालिका खाजगी चँनेलवरची पहिली तर, मराठी मालिकाविश्वातली दामिनी नंतरची दुसरी ‘डेली सोप’ होती. कोणताही भपकेबाजपणा नाही की मेलोड्रामा नाही. एक साधं, सरळ कथानक, जोडीला अनुभवी कलाकार आणि विनय आपटे यांचं दिग्दर्शन यामुळे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली.
श्वास की दृष्टी? एक अवघड प्रश्न. श्वास वाचवायचा, तर दृष्टी गमवावी लागणार आणि दृष्टी गमवायची नसेल तर, श्वास कधीही थांबू शकेल. काय करावं? जे आहे ते स्वीकारून जगायचं की, जमेल तितकं पण मनमुराद जगायचं?
एकीकडे तीनही खान बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत होते. देशातील समस्त तरुणाईला त्यांनी वेड लावलं होतं, तर दुसरीकडे मराठी चित्रपट मात्र चाचपडत होते. असं नव्हतं की, यादरम्यान चांगले मराठी चित्रपट निर्माण झाले नाहीत. उलट या काळात मराठीमध्ये कित्येक चांगले चित्रपट बनले, पण बॉलिवूडच्या झगमटामागे ते झाकोळले