ऐश्वर्या राय आणि विक्रम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यातील भव्यता पाहून प्रेक्षकांनी बाहुबलीपेक्षा ‘पोनियिन सेलवन 2’ अधिक चांगला झाल्याची पावती दिली आहे.
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा ‘शाकुंतलम’ चित्रपट प्रदर्शित झालाय. ‘शाकुंतलम’ हा सामंथाचा पहिला चित्रपट आहे, जो तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. महाकवी कालिदास यांचे जगप्रसिद्ध महाकाव्य शांकुतलवर आधारीत हा चित्रपट तशाच भव्य स्वरुपात मोठ्या पडद्यावर आणण्यात चित्रपटाचे दिग्दर्शक गुणशेखर यशस्वी झाले आहेत.
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा प्रभूची प्रमुख भूमिका असलेला ‘शांकुतलम’ हा चित्रपट 14 एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर येत आहे. ‘शांकुतलम’ हा थ्रिडी चित्रपट असून त्याच्या ट्रेलरमधून चित्रपटाच्या भव्यतेची जाणीव होत आहे. सामंथाच्या अभिनयाचे वेगळे रुप यात बघायला मिळणार आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार नानी याचा दसरा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालाय. नानीच्या या दसराची एवढी क्रेझ प्रेक्षकांमध्ये होती की, अनेक ठिकाणी पहाटे पाच पासून या चित्रपटाचे शो सुरु झाले.
Ps 1 च्या पहिल्या भागात नंदिनी नेमकी कोण आहे, ती राजकुमाराला वाचवते का? या प्रश्नावर चित्रपट थांबला होता. आता तेव्हापासूनच Ps 2 सुरु होतोय. यात नंदिनी नेमकी कोण आहे, याचा उलगडा होणार आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरुन गेल्या वर्षी अक्षरशः महाभारत झालं. गेल्या वर्षी या चित्रपटाचा एक छोटासा टीझर प्रदर्शित झाला आणि चित्रपटातील राम, सिता आणि हनुमानाच्या लुकवरुन दिग्दर्शक ओम राऊत यांच्यावर सोशल मिडियात कमालीची टिका झाली.
नेटफ्लिक्सवर आलेली ‘द नाईट एजंट’ नावाची वेबसिरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसबाबत अनेक रहस्यमयी कथा सांगितल्या जातात. तशाच एका रहस्याभोवती ‘द नाईट एजंट’ ही सिरीज गुंफण्यात आली आहे. जबरदस्त कथानक हे या सिरीजचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल. सिरीजची सुरुवातच प्रेक्षकांना बांधून ठेवते.
ZEE5 ची नवीन वेबसिरीज ‘ताज डिव्हायडेड बाय ब्लड’ ची घोषणा झाल्यापासून खूप चर्चेत राहिली. एकतर त्यातील स्टारकास्ट. या सिरिजमध्ये नसरुद्दीन शाह पासून धर्मेंद्र पर्यंत सर्व स्टार आहेत. त्यात अकबरची भूमिका साकारत असलेल्या नसरुद्दीन शाह यांच्याबरोबर त्यांच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान असलेली संध्या मृदुल ही जोधाबाईच्या भूमिकेत आहे.
आपल्या वाढत्या वजनाचा आणि जाडजूड व्यक्तिमत्त्वाची लाज न बाळगता, त्याचेच भांडवल करुन प्रेक्षकांना हसवणारा सच्चा कलाकार म्हणजे सतिश कौशिक. मिस्टर इंडिया चित्रपटात कॅलेंडर हे पात्र साकारणारा ते Scam1992 या चित्रपटात शेअरब्रोकर मनुभाई…. वाक्यावाक्याला शिव्या देणारा…अशा अनेक भूमिका साकारणारे सतीश कौशिक यांनी या जगातून अचानक एक्झिट घेतली आहे.
अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये रविवारी, 12 मार्च रोजी अर्थात भारतात 13 मार्च रोजी ऑस्कर पुरस्काराचा शाही सोहळा होणार आहे. हा सोहळा स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. यासाठी एसएस राजामौली यांचा RRR हा चित्रपट प्रमुख दावेदार मानला जातोय.