Skip to content Skip to sidebar Skip to footer

गीता गोविंदमचा पार्ट 2 येणार का?

गीता गोविंदम हा चित्रपट 2018 मध्ये मोठ्या पडद्यावर आला. मुळात तेलुगु-भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन परशुराम पेटला यांनी केले होते. त्यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. एक हळुवार प्रेमकथा असलेल्या या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि रष्मिका मंदाना यांचा अप्रतिम अभिनय आहे. शिवाय अत्यंत सुमधूर अशी गाणी. 

Read more

सामंथाची 30 किलोची साडी आणि कोटींचे दागिने….

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सामंथा प्रभू आता शाकुंतलम या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर येत आहे. 17 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणा-या या चित्रपटाची सामंथाच्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे. त्यातच आता शाकुंतलमचा फोटो सामंथानं शेअर केला आहे.

Read more

दसरा आणि करुंगापायमची प्रतीक्षा…

नानी आणि काजल यांच्या या चित्रपटांच्या ट्रेलरच्या माध्यमातून या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. एकीकडे दसरामध्ये नानीचा लूक हा अल्लू अर्जूनच्या पुष्पासारखा झाला आहे.  तर दुसरीकडे काजल अग्रवालच्या करुंगापायमचा ट्रेलरही प्रेक्षकांना भावलाय.  करुंगापायम चित्रपटात काजलची अनेक रुपे बघता येणार आहेत.

Read more

आज नजर फक्त आल्यावर…

आज तमाम भारतीयांची नजर ऑस्कर (Oscar) नामांकन यादीवर राहणार आहे. ऑस्कर 2023 च्या नामांकन यादीत स्थान मिळवलेल्या चित्रपटांची नावे जाहीर झाली आहेत. त्यात ‘एसएस राजामौली’ यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटासह अन्यही चित्रपटांचा समावेश आहे. आता या यादीतून नेमकं कोणाकडे ऑस्करची (Oscar) मानाची बाहुली जाणार आहे, त्याचा फैसला काही तासातच होणार आहे.

Read more

‘नाटू नाटू’चा गोल्डन ग्लोबमध्ये डंका….

2023 ची सुरुवातच एस एस राजामौली यांच्यासाठी आनंदाची बहार घेऊन आली आहे. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांची प्रमुख भूमिका असलेल्या आरआरआरनं बॉक्स ऑफीसवर आपला डंका वाजवला. देशातच काय पण परदेशातही आरआरआरचा मोठा फॅन क्लब तयार झाला. या आरआरआरच्या नाटू नाटू गाण्यानं सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी असलेल्या गोल्डन ग्लोब पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.

Read more

सामंथा रुथ प्रभूचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘शाकुंतलम’चा ट्रेलर रिलीज

शाकुंतलमसाठी सामंथान पौराणिक कथांचा अभ्यासही केल्याची माहिती आहे. एकूण ट्रेलरमधून तर सामंथानं या चित्रपाटातील आपल्या लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे. 17 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणारा शाकुंतलम बॉक्सऑफीसवर कुठले रेकॉर्ड तोडतो, याकडे लक्ष लागले आहे.  

Read more

रॉ एजंटच्या मिशनवर आधारित असलेला ‘मिशन मजनू’

रॉ एजंटच्या मिशनवर आधारित असलेला मिशन मजनू हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.  20 जानेवारी रोजी प्रदर्शित होणा-या या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 1971 मध्ये भारताने पाकिस्तानसोबतच्या युद्धात विजय मिळवला.

Read more

अ‍ॅव्हेंजर्स सिरीजमधील सुपरहिरो जेरेमीचा अपघात

‘जेरेमी रेनर’ हा प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता आहे.  जेरेमीला दोनदा ऑस्करसाठी नामांकनही मिळाले आहे. ‘द हर्ट लॉकर’ आणि ‘द टाऊन’ सारख्या चित्रपटांमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी नामांकनही मिळाले होते. जेरेमी रेनर गेल्या वर्षी मे महिन्यात भारतात आला होता. 

Read more

उद्या पाहायला मिळणार निळ्या जगाची जादू….

जगातील सर्वात महागडा चित्रपट उद्या मोठ्या पडद्यावर येत आहे. अवतार- द वे ऑफ वॉटर हा दिग्दर्शक, लेखक जेम्स कॅमेरॉन यांच्या अवतार या दहा वर्षापूर्वी आलेल्या चित्रपटाचा दुसरा भाग.  या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडले. 

Read more

‘द काश्मीर फाइल्स’चा वाद पुन्हा रंगणार

द काश्मीर फाइल्सवर सातत्यानं टिका करणारी वादग्रस्त अभिनेत्री स्वरा भास्कर हिला आयतं निमित्त मिळालं आहे.  तिनं या वादात उडी घेतली आहे.  संपूर्ण जग सत्य पहात असल्याचं ट्विट तिनं केल्यानं द काश्मीर फाइल्सचा वाद पुन्हा रंगणार अशी चिन्हे आहेत.  

Read more