अभिनेता ते सुत्रसंचालक अशी ओळख मिळवणारा श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सध्या ‘चल भावा सिटीत’ या त्याच्या नव्या कार्यक्रमामुळे विशेष चर्चेत आहे. श्रेयस तळपदे हा एक हरहुन्नरी अभिनेता तर आहेच पण एक उत्तम डबिंग आर्टिस्ट ही ओळखही त्याने ‘पुष्पा’ चित्रपटामुळे निर्माण केल आहे. पण तुम्हाला माहित आहे का? श्रेयसने अभिनयक्षेत्रात न येता एका वेगळ्याच क्षेत्रात करिअर करावं अशी…
भव्य-दिव्य सेट, हिरे, मोती, सोण्यांनी नटलेल्या अभिनेत्री, ग्रॅण्ड चित्रपट म्हटलं की दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. हिरामंडी या वेब सीरीजनंतर आता लवकरच संजय लीला भन्साळी ‘लव्ह अॅण्ड वॉर’ (Love And War) हा चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.…
सलमान खान (Salman Khan) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्याने लोकांना वेड लावलं असून आता चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता अधिक लागली आहे. सलमानने यंदा शुक्रवार किंवा ईदच्या दिवशी चित्रपट रिलीज करण्याचा स्वत:चाच ट्रेण्ड मोडून चक्क रविवारी चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे…
हिंदी चित्रपटसृष्टीचा भाईजान सलमान खान (Salman Khan) दरवर्षी ईदनिमित्त नवा कोरा चित्रपट भेटीला आणत असतो. यापूर्वी त्याचे ‘वॉंटेंड’, ‘दबंग’, ‘एक था टायगर’ (Ek Tha Tiger) असे अनेक चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित झाले होते आणि त्याचा त्याला बॉक्स ऑफिसवर चांगलाच फायदा झाला होता. मात्र, आता ‘सिंकदर’ (Sikandar) चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल त्याने महत्वाचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी…
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या जोडीचा प्रत्येक चित्रपट हिट ठरलाच. ‘मुक्कदर का सिकंदर’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘खुन पसिना’ अशी यादी मोठी आहे. जितकी त्यांच्या चित्रपटांची चर्चा आजही केली जाते तितकीच त्यांच्या नात्याबद्दलही केली जातेच. आज जाणून घेऊयात असाच एक खास किस्सा. लोकप्रिय लेखक हनीफ झवेरी यांनी एका मुलाखतीत अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांच्या ‘सिलसिला’…
काही अभिनेत्यांशिवाय मराठी चित्रपटसृष्टीची कल्पना करणं अशक्य आहे. आणि त्यातील दोन महत्वाची नावं म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf) आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde). जसे हे दोघे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत; अगदी तशीच ही मराठी चित्रपसृष्टी या दोघांच्या अभिनयाशिवाय अपूर्ण आहे. आजही विनोदी चित्रपट कोणता पाहायचा असा प्रश्न पडला की आपसूकच अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे…
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), दीपिका पादूकोण, प्रभास (Prabhas) आणि कमल हासन यांची प्रमुख भूमिका असणारा ‘कल्की २८९८’ एडी चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला. माणसाचं भवितव्य, पृथ्वीचा अंत या भविष्यात होऊ घातलेल्या काल्पनिक घटना या चित्रपटात दाखवल्या आहेत. तसेच, महाभारत या पौराणिक कथेला तंत्रज्ञानाची जोड देत ‘कल्की’ चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळीच अनुभूती नक्की देतो. २०२४ मध्ये…
हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या सीक्वेलसची लाट आली आहे. २००७ साली आलेल्या ‘धमाल’ चित्रपटाने यशस्वीरित्या याच चित्रपटाचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते. आता लवकरच धमाल फ्रॅंचायझीमधील चौथा भाग भेटीला येणार आहे. आता ‘धमाल ४’ (Dhamaal 4) म्हटलं की चौपट धमाका होणारच. या चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. आणि आता पुन्हा एकदा सगळे मित्र नव्या…
‘बिग बॉस मराठी सिझन ५’ (Big Boss Marathi Season 5) च्या विनर ट्रॉफीवर सूरज चव्हाणने (Suraj Chavan) आपलं नाव कोरलं आहे. सूरजने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आणि आता पुन्हा एकदा तो आपला जलवा दाखवायला सज्ज आहे. सूरज चव्हाण लवकरच ‘झापुक झुपूक’ या त्याच्या पहिल्या मराठी चित्रपटात दिसणार आहे. नुकताच त्याच्या या दमदार चित्रपटाचा टीझर प्रदर्शित…
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांचा हौशी रंगभूमीपासून सुरु झालेला अभिनयाचा प्रवास आजही अविरतपणे सुरु आहे. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका खरंतर आजच्या नवोदित कलाकारांसाठी अभिनयाचं पुस्तक आहे असं म्हणावं लागेल. विनोदी, गंभीर, खलनायक अशा वेगवेगळ्या अभिनयाच्या आयामांचे दर्शन त्यांनी त्यांच्या सादरीकरणातून आजवर दिलं आहे. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ मधील आबा असो किंवा ‘चौकट राजा’ मधील…