हिंदी चित्रपसृष्टीतील ९०चं दशक शाहरुख खान, माधुरी, करिश्मा कपूर, सलमान खान यांनी तुफान गाजवलं. एकाहून एक सुपरहिट चित्रपट त्यांनी प्रेक्षकांना दिले जे आजही २०-२२ वर्षांनी प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. सध्या बॉलिवूडमध्ये जुने गाजलेले चित्रपट रि-रिलीज करण्याचा सपाटा सुरु आहे. यात ‘तुंबाड’, ‘कहो ना प्यार है’, ‘रेहना है तेरे दिल में’, ‘करण-अर्जुन’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश होता.…
आपल्या मित्र मैत्रिणींसोबत घालवलेला प्रत्येक दिवस खरंच कमालीचे असतात. तेव्हाचे क्षण, केलेली गंमत, मित्र-मैत्रिणींसोबत केलेली भांडणं या गोष्टी राहून राहून आठवतात. विचार करा बऱ्याच वर्षानंतर शाळेतल्या त्या सर्व मित्र-मैत्रिणींसोबत तुम्हाला धम्माल, मज्जा, मस्ती करण्याची संधी मिळाली तर? रियुनियन ची अशीच संधी साधत सेलिब्रेशनसाठी जमलेल्या मित्रांची गोष्ट सांगणारा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा धमाल चित्रपट २८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात मनोरंजनासाठी…
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ (Chhaava) १४ फेब्रुवारी २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित झाला होता. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात शंभु राजांची भूमिका विकी कौशलने साकारली असून महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना झळकली आहे. १२ दिवस चित्रपट प्रदर्शित होऊनही अजून प्रेक्षक मोठ्या संख्येने जाऊन हा चित्रपट पाहात आहेत. छावा चित्रपटाती शेवटचे काही…
चंदेरी दुनिया अर्थात चित्रपटसृष्टी म्हटलं की लाखो करोडोंची उलाढाल ही आलीच शिवाय जितके प्रसिद्ध कलाकार तितकी त्यांची एका चित्रपटाची फी देखील आलीच. ९०च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत खान्सचा बोलबाला होता. सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान, आमिर खान अगदी सैफ अली खान सुद्धा. एका एका चित्रपटासाठी हे अभिनेते ६०-७० लाखांच्या घरात फी घेत होते. पण तुम्हाला माहित…
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हिंदीसह दाक्षिणात्य भाषांनाही भूरळ पडली आणि या चित्रपटाचे वेगवेगळ्या भाषांमध्ये रिमेक झाले. २०१८ साली ‘धडक’ हा हिंदी चित्रपट आला ज्यात जान्हवी कपूर आणि इशान खट्टर प्रमुख भूमिकेत होते. आता लवकरच ‘धडक २’ हा चित्रपट येणार असून यात तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य…
सगळीकडे सध्या एकाच चित्रपटाची चर्चा आहे तो म्हणजे छावा. अभिनेता विकी कौशल याने साकारलेला छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेक्षकांच्या नजरेसमोरून हटत नाहीयेत. शिवाय लक्ष्मण उतेकर यांचं दिग्दर्शन हा ऐतिहासिकच अजरामर करतो. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार दिसले. त्यापैकी दोन कलाकार विशेष लक्षात राहिले कारण त्यांनी जी पात्र साकारली आहेत त्यांच्यामुळे छत्रपती संभाजी राजे पकडले गेले. गणोजी…
ऐतिहासिक चित्रपट करणं फार जोखमीचं आणि जबाबदारीचं काम आहे. त्यातही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, शौर्य जर का मोठ्या पडद्यावर मांडायचा असेल तर अभिमानाने उर भरुन येतो. छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर यावा असा अट्टहास मनाशी बाळगून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ‘छावा’ या चित्रपटाचं शिवधनुष्य हाती घेतलं आणि लिलया पेललं. शिवाय, छत्रपती…
चंदेरी जगात आपलं ग्लॅमर टिकवून ठेवण्यासाठी कलाकारांना फार मेहनत करावी लागते. मग हॅालिवूड असोत किंवा अन्य कोणतीही चित्रपट इंडस्ट्री. वय वाढलं तरीही सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी किंवा मीडियामध्ये सतत चर्चेत राहण्यासाठी अभिनेत्री किंवा अभिनेते स्टंट करत असतात. काही दिवसांपूर्वीच केन वेस्ट याने स्टंटसाठी आपल्या बायकोला ट्रान्सपरन्ट ड्रेस परिधान करायला लावला होता. आणि आता प्रसिद्ध अमेरिकन गायिका…
चित्रपटसृष्टीचा पाया एका मराठमोळ्या माणसाने रोवला. दादासाहेब फाळके यांनी मनोरंजनासाठी रोवलेलं चित्रपटांचं बीज आज २१व्या शतकात भलं मोठं वृक्ष झालं आहे. काळानुसार बदलणारी टेक्नॉलॉजी सर्वच भाषेतील चित्रपटांचा दर्जा उंचावत आहे. खरं तर भारतीय चित्रपटसृष्टी म्हटलं की हिंदी, पंजाबी, बंगाली, गुजराती, दाक्षाणित्य अशा अनेक भाषेतील चित्रपट यात सामावले जातात. पण प्रामुख्याने हिंदी चित्रपटांचाच अधिक उल्लेख केला…
चित्रपट, वेब सीरीज किंवा अन्य कोणत्याही पद्धतीचा कंटेन्ट घरबसल्या पाहण्यासाठी आता आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. वेगवेगळ्या ओटीटी वाहिन्या आपल्या बोटांवर आल्या असून जगभरातील कुटल्याही भाषेतील कंटेन्ट आपण पाहू शकतो. अलीकडच्या काळात कोरीअन सीरीज किंवा चित्रपट आणि दाक्षिमात्य चित्रपट, वेब सीरीज मो्या प्रमाणात पाहिल्या जात आहेत. त्यासोबतच इतर भाषेतील अनेक कलाकारही दाक्षिणात्य कलाकृतींचा भाग होताना दिसतायत.…