बक्कळ पैसा असूनही काही माणसं त्यांच्या स्वच्छ, निर्मळ मनाने आणि त्यांच्या कर्तुत्वाने आपल्या मनावर अधिराज्य करतात. त्यापैकीच दोन नावं म्हणजे बाबा आमटे आणि रतन टाटा. रतन टाटा यांनी उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलीच पण समाजसेवा करुन लोकांची मनं देखील जिंकली. ही दोन्ही माणसं आपल्यातून कधीच निघून जाऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. अशीच इच्छा मराठी अभिनेत्री…
वेगवेगळ्या माध्यमांमध्ये सक्रिय असूनही अनेक तरुण कलावंतांनी वाट धरली आहे ती रंगभूमीची. प्रयोगशीलतेबरोबरच काळ अवकाशाच्या अनेक शक्यता आपल्या नाट्यकृतीतून आजमावू पाहणारी सृजनशील युवा पिढी त्यांना पडणारे प्रश्न नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडत आहेत. रंगभूमीवर सध्या येत असलेले विषय तरुण पिढीला भावत आहहेत. ज्यावर संवाद घडण्याची गरज असते असे विषय हाताळले जात आहेत. अशाच काही सृजनशील युवा…
स्त्री शिक्षणाची मुहुर्तवेढ रोवणारे सत्यशोधक महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ (Phule) या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. परंतु, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली असून आता २५ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल असे सांगितले जात आहे. चित्रपटातील काही मुद्द्यामुळे वाद निर्माण झाला असून प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.…
विविधांगी भूमिका साकारणारे मनोज बाजपेयी यांनी आजवर बऱ्यापैकी गंभीर भूमिका केल्या. पण कधीच त्यांनी हॉरर चित्रपटात काम केलं नाही. परंतु, लवकरच मनोज बाजपेयी त्यांच्या चाहत्यांसाठी एक नवं सरप्राईज घेऊन येणार आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक राम गेपाल वर्मा यांच्यासोबत मनोज बाजपेयी पुन्हा एकदा दिसणार असून लवकरच हॉरर कॉमेडी चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिग्दर्शक आणि अभिनेत्याची ही जोडी…
'गदर २' चित्रपटाच्या तुफान यशानंतर आता सनी देओल (Sunny Deol) ‘जाट’ या नव्या चित्रपटातून भेटीला आले आहेत. पुन्हा एकदा सनी देओल अॅक्शन करताना दिसणार आहेत. सिकंदर पाठोपाठ हा चित्रपट रिलीज झाला असून जाणून घेऊयास सनी देओल सलमान खानच्या चित्रपटाला टक्कर देऊ शकला आहे की नाही.(Bollywood movies)
१० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुट्टीच्या…
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तेजस देऊस्कर दिग्दर्शित 'देवमाणूस' (Devmanus) चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतूनही या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगणलाही (Ajay Devgan) या ट्रेलरने भुरळ घातली आहे. आपल्या सोशल मीडियावर ट्रेलर पोस्ट करत त्याने निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या मराठीतील पदार्पणाबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच, इतर…
एखाद्या कलाकाराची वर्सटॅलिटी कशी ओळखली जाते? तर जितक्या विविध प्रकारच्या तो भूमिका करतो त्यात केवळ प्रेक्षकांना ते पात्र दिसतं तेव्हा कलाकाराच्या अभिनयाला यश येतं. मात्र, अलीक़डच्या काळात एकसारख्या भूमिका वारंवार केल्यानंतर आपल्याला टाईपकास्ट केलं जाईल या भितीने साचेबद्ध भूमिका करण्यास बरेच अभिनेते कुरकुरक करतात. पण तुम्हाला माहित आहे का हिंदी चित्रपटसृष्टीतील हा एक कलाकार आहे…
नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे अभिनेते भरत जाधव सध्या फारसे चित्रपटांमध्ये रमताना दिसत नाहीत. गेल्या काही काळात ते नाटकांमध्ये काम करताना दिसतात पण मालिका आणि चित्रपटांपासून ते फारच लांब गेले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी २०१७ पासून फारसे चित्रपट का केले नाहीत त्याचं कारण अखेर सांगितलं आहे. (Bharat Jadhav)
भरत…
“जा सिमरन जी ल अपनी जिंदगी...” या आयकॉनिक डायलॉगला ३० वर्ष लवकरच पुर्ण होणार आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अजरामर चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (DDLJ). काजोल (Kajol) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) या जोडीने या चित्रपटातून त्यांचा लाईफटाईम चाहतावर्ग निर्माण केला. १९९५ मध्ये आलेल्या DDLJ या चित्रपटाला देशासह जगभरातून तुफान प्रतिसाद मिळाला. आजही…
बॉलिवूडमधील लोकप्रिय सुपरहिरो ‘क्रिश’ लवकरच एका वेगळ्या अंदाजात आपल्याला भेटायला येणार आहे. ‘कोई मिल गया’ (Koi Mil Gaya) चित्रपटापासून सुरु झालेली ‘क्रिश’ चित्रपटाची फ्रॅंचायझी आता ‘क्रिश ४’ पर्यंत येऊन ठेपली आहे. अनेक कारणांसाठी खरं तर ह्रतिक रोशनचा ‘क्रिश ४’ (Krrish 4) चित्रपट महत्वाचा आहे. यातील प्रमुख कारण म्हणजे या चित्रपटातून ह्रतिक दिग्दर्शनाचा प्रवास सुरु करणार…