काल ९४ व्या ऑस्कर पुरस्काराची यादी जाहीर करण्यात आली. दुर्दैवाने यावर्षीच्या यादीमध्ये कोणत्याही भारतीय चित्रपटाला या नामांकन यादीत स्थान मिळाले नाही. परंतु, ‘रायटिंग विथ फायर (Writing with Fire)’ या माहितीपटाने मात्र या यादीत स्थान पटकावत भारताच्या आशा पल्लवित केल्या आहेत. या माहितीपटात दलित महिला पत्रकारांनी चालवलेल्या ‘खबर लहरिया’ या वृत्तपत्राची कहाणी दाखवण्यात आली आहे.
प्रेक्षकांच्या मनाला अबोल प्रेमाची सुमधुर हाक, हा ‘पांघरूण’ सिनेमा देतो. मेकर्सनी दावा केल्याप्रमाणे ‘एक विलक्षण प्रेमकहाणी’ त्यांनी आपल्या समोर मांडली आहे. त्या प्रेमकहाणीचे पैलू व्यक्तिनुरूप, प्रेक्षकांच्या बुद्धीच्या आकलन क्षमतेनुसार बदलतील. पण सिनेमा, त्यातील पात्र, कथानक आणि महत्वाचं म्हणजे तो ‘संदेश’ आपल्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही.
तुफान विनोदी चित्रपटाच्या धाटणीतला असा हा ‘लोच्या झाला रे’. चित्रपटाचे ट्रेलर ज्यांनी पाहिलं असेल त्यांना या विनोदी मेजवानीचा अंदाज नक्कीच आला असेल.लंडनसारख्या निसर्गरम्य ठिकाणी चित्रित झालेला हा सिनेमा मनाला आनंद देणारा आहे. कारण, तो आपल्याला पोट धरुन हसायला भाग पाडतो.
भीमसेन जोशी यांच्या फसलेल्या मैफिलाचा जसा मी साक्षीदार आहे पण त्याच ठिकाणी परत दामदुपटीने एखाद्याचं देणं परत करावं या त्वेषाने भीमसेन यांनी जी मैफिल जमवली त्याचं वर्णन म्हणजे ज्याचं नाव ते असंच करावं लागेल.
वहिदाने जागच्या जागी उभं राहून केलेल पदन्यास आणि मुद्राभिनय पाहून कुणाच्याही तोंडातून वा! अशी दाद जातेच. हे सोपं काम नाही, ही आयुष्यभराची मेहनत आहे आणि जिद्द आहे.
मराठी चाहत्यांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक म्हणजे चिन्मय मांडलेकर.
नृत्याच्या अनेक ‘रिअॅलिटी शोज्’मध्ये नृत्य आणि सर्कस यांमधील फरक न ओळखू शकणारे कलाकार पाहून खऱ्या अभिजात कलेची व हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत उरलेल्या काही कसलेल्या कलावंतांची आठवण होते. यामधील एक नाव म्हणजे पंडित बिरजू महाराज!
संजू आणि रणजीतच्या आयुष्यात म्हणजेच कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ या लोकप्रिय मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे. हा ट्विस्ट म्हणजे संजूच्या पोटात लागलेली गोळी.
‘तू तेव्हा तशी’ म्हणत स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर छोट्या पडद्यावर पुनरागमन करतायत. या मालिकेच्या निमित्ताने स्वप्नील तब्बल १० वर्षांनी झी मराठीवरील दैनंदिन मालिकेत दिसणार आहे. स्वप्नील जोशी आणि प्रेमकथा यांचं नातं तसं जुनं आहे.
सत्तरच्या दशकात आईच्या भूमिकेमध्ये निरुपा रॉयने साकारलेले प्रत्येक पात्र म्हणजे बॉलिवूडचा संस्मरणीय ठेवा आहे. पण केवळ ‘आईच्या भूमिका’ हिच निरुपा रॉयची ओळख नव्हती.